कर्करोगाचे बहुतांश बळी दुर्दैवामुळे
By Admin | Updated: January 3, 2015 02:31 IST2015-01-03T02:31:57+5:302015-01-03T02:31:57+5:30
बहुतांश रुग्ण दुर्दैव म्हणूनच या रोगाला बळी पडतात असा निष्कर्ष अमेरिकेतील नव्या अभ्यासाद्वारे काढण्यात आला आहे.

कर्करोगाचे बहुतांश बळी दुर्दैवामुळे
वॉशिंग्टन : कर्करोग होण्यासाठी प्रदूषण, आनुवंशिकता अशी अनेक कारणे दिली जात असली तरीही कर्करोग होणारे बहुतांश रुग्ण दुर्दैव म्हणूनच या रोगाला बळी पडतात असा निष्कर्ष अमेरिकेतील नव्या अभ्यासाद्वारे काढण्यात आला आहे. सायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून ते करण्यासाठी सांख्यिकी पद्धतीचा आधार घेण्यात आला आहे.
या संशोधनात कर्करोग होण्याची कारणे तीन विभागांत विभाजित करण्यात आली आहेत. दुर्दैव, पर्यावरणातील बदल व आनुवंशिकता या तीन गटांत कर्करोगाच्या रुग्णांनी आपली कारणे दिली आहेत.
बदलती जीवनपद्धती आणि सवयी यामुळे काही प्रकारचे कर्करोग होतात; पण सर्व प्रकारच्या कर्करोगात हीच कारणे नसतात, असे संशोधक व जॉन हाफकिन्स वैद्यकीय विद्यापीठाचे आँकालॉजी विषयाचे सह प्राध्यापक क्रिस्टन तोमासेटी यांनी म्हटले आहे. शरीरातील मुख्य पेशी (स्टेम सेल) मोठ्या प्रमाणात विभाजीत होऊन कर्करोगाच्या गाठी तयार होतात.
(वृत्तसंस्था)