दुबईत मुसळधार पाऊस, रस्ते, गाडया पाण्याखाली
By Admin | Updated: March 9, 2016 16:43 IST2016-03-09T16:08:45+5:302016-03-09T16:43:23+5:30
वाळवंटी प्रदेश असलेल्या दुबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे दुबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.

दुबईत मुसळधार पाऊस, रस्ते, गाडया पाण्याखाली
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. ९ - वाळवंटी प्रदेश असलेल्या दुबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे दुबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले असून, काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या आहेत.
अनेक भागात वाहने पाण्याखाली गेली असून, पाण्याची पातळी वाढली आहे. दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात मुंबईत पावसाळयात जे चित्र असते तशी स्थिती दिसत आहे. अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली असून, दुबईतील शाळांनी मुलांना लवकर शाळेतून घरी घेऊन जाण्याचे पालकांना आवाहन केले आहे.
पावसामुळे दुबई-अबूधाबी मार्गावर दुश्यमानता कमी झाली आहे. वाहनचालकांना जपून गाडी चालवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शारजामध्येही असेच चित्र आहे.
( सर्व छायाचित्रे : अखिल के, दुबई)