पाण्यात बुडत असलेल्या मित्राला वाचवण्यासाठी धावत गेला दुबईचा क्राउन प्रिन्स, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 12:57 PM2021-08-02T12:57:20+5:302021-08-02T12:59:22+5:30

व्हिडीओत दुबईचा क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम पाण्यात बुडत असलेल्या एका मित्राच्या मदतीसाठी धावत जाताना दिसत आहे.

Dubai crown prince Sheikh Hamdan Bin Mohammed Bin Rashid al Maktoum runs to save his friend in water watch video | पाण्यात बुडत असलेल्या मित्राला वाचवण्यासाठी धावत गेला दुबईचा क्राउन प्रिन्स, व्हिडीओ व्हायरल

पाण्यात बुडत असलेल्या मित्राला वाचवण्यासाठी धावत गेला दुबईचा क्राउन प्रिन्स, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

असं सांगितलं जातं की, कठिण काळात जो कामात येईल तोच खरा मित्र आहे आणि अशाचप्रकारचा मित्र दुबईचा क्राउन प्रिन्स आहे. जो आपल्या मित्राला संकटात पाहून पाण्यात धावत जातो. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत दुबईचा क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम पाण्यात बुडत असलेल्या एका मित्राच्या मदतीसाठी धावत जाताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये नासिर अली नेदीला वॉटर जेटपॅकिंगसाठी तयार होताना बघू शकता. ज्यात जेटच्या मदतीने लोकांना पाण्यातून ३० फूट वरपर्यंत नेता येतं. सगळं काही चेक केल्यावर जसा तो जेटपॅकिंग करतो अचानक गमतीचं वातावरण गंभीर होऊन जातं. नासिरचा कंट्रोल जातो आणि तो पाण्यात बुडू लागतो. 

काही वेळासाठी नासिर व्हिडीओत दिसत नाही. हे बघताच शेख हमदान बिन मोहम्मद जो एक अॅडव्हेंचर प्रेमी आहे तो लगेच आपल्या मित्राच्या मदतीसाठी पाण्यात धावत जातो. तो नासिरजवळ जातो. तोपर्यत नासिरही पाण्यातून वर येतो. प्रिन्स मित्राला मिठी मारतो. नंतर दोघेही व्हिडीओत हसताना दिसतात.

इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये #CloseCall लिहिलं गेलं आणि नेयादीला टॅक करण्यात आलं. ज्यावर अनेकांनी इमोजीसोबत कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्यावर तीन तासात १२५,००० पेक्षा अधिक वेळा बघितला गेला आहे. या व्हिडीओला १९ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
 

Web Title: Dubai crown prince Sheikh Hamdan Bin Mohammed Bin Rashid al Maktoum runs to save his friend in water watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.