शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
2
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
3
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
4
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
5
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
6
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
7
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
8
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
9
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
10
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
11
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
12
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
13
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
14
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
15
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
16
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
17
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
18
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
19
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
20
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत

फक्त दोन आंब्यांची चोरी, कर्मचाऱ्याला पडली भारी; झाला तब्बल एवढा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 11:42 IST

एका व्यक्तीला चोरून आंबा खाणं चांगलंच महागात पडलं आहे.

ठळक मुद्देआंबा खाणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं असून तब्बल 96 हजारांचा दंड भरावा लागणार आहे.कोर्टाने व्यक्तीला शिक्षा म्हणून 5000 दिरहम म्हणजे जवळपास 96 हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितलेदोन वर्षापूर्वी झालेल्या या घटनेची आता कोर्टात सुनावणी झाली.

आंबा हे फळ प्रत्येकाच्याच आवडीचं आहे. मात्र एका व्यक्तीला चोरून आंबा खाणं चांगलंच महागात पडलं आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱ्या एका व्यक्तीला प्रवाशाच्या सामानातील आंबा चोरल्याप्रकरणी कोर्टात फेऱ्या माराव्या लागल्या आहेत. आंबा खाणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं असून तब्बल 96 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. कोर्टाने व्यक्तीला शिक्षा म्हणून 5000 दिरहम म्हणजे जवळपास 96 हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये ही घटना घडली आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱ्या एका 27 वर्षीय व्यक्तीवर दोन आंबे चोरण्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करताना विमानतळावरील सुरक्षा रक्षकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यावेळी एक व्यक्ती प्रवाशाची बॅग उघडून त्यातून दोन आंबे चोरताना दिसत आहे. त्या व्यक्तीने चोरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. चौकशी दरम्यान व्यक्तीने दोन आंबे चोरल्याचं कबूल केलं. दोन वर्षापूर्वी झालेल्या या घटनेची आता कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने नुकसान भरपाई म्हणून 5000 दिरहम म्हणजेच 96000 रुपयांचा दंड भरण्यास सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

8,800 रुपयांच्या 'पावती'विरोधात कोर्टात गेला अन् तीन वर्षांत किती 'पावत्या' फाटल्या तुम्हीच बघा!सध्या देशभरात ट्रॅफिकच्या नव्या नियमांमुळे लोकांना नियम तोडणं चांगलंच महागात पडत आहे.लोकांना भराव्या लागलेल्या अव्वाच्या-सव्वा दंडावरूनही चर्चा सुरू आहे. अशातच ब्रिटनमधील एक घटना समोर आली आहे. ब्रिटनमध्ये राहणारे 71 वर्षीय रिचर्ड कीडवेल यांना वेगाने गाडी चालवल्याने दंड पडला होता. त्यांना 100 पाउंड म्हणजेच साधारण 8,800 रूपये दंड लावला. मात्र, हा दंड न भरता या विरोधात ते कोर्टात गेले. कोर्टात केस चालवण्यासाठी त्यांना तब्बल  30 हजार पाउंड म्हणजेच 26.6 लाख रूपये खर्च आला. पण इतका खर्च करूनही ते केस हरले.

बाबो! एका बीअरसाठी हॉटेलने घेतले 50 लाख रुपये, ग्राहक हैराण!मॅन्चेस्टरच्या एका हॉटेलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराकडून एका बीअरसाठी तब्बल 50 लाख रूपये वसूल करण्यात आले. या घटनेनंतर चांगलाच गोंधळ उडाला. पत्रकार  पीटर लालोर ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तपत्रात स्पोर्ट एडिटर आहेत. पीटर लालोर एशेज टेस्ट सीरिज कव्हर करण्यासाठी ब्रिटनला गेले होते. हॉटेलमध्ये मित्रांसोबत बसलेले असताना त्यांनी त्यांच्यासाठी एक बीअर ऑर्डर केली. ज्यावेळी पीटर या बीअरचं बिल देत होते. त्यावेळी त्यांनी चष्मा घातलेला नव्हता. दरम्यान पेमेंट मशीनमध्ये काही गडबड झाली आणि बिल पेड झालं. जेव्हा नंतर तेथील स्टाफने बिलाची स्लीप पाहिली तेव्हा तो हैराण झाला. त्याने पीटर लालोरला सांगितलं की, तुमच्याकडून 50 लाखांपेक्षा अधिक बिल पे झालं आहे. 

टॅग्स :DubaiदुबईMangoआंबाtheftचोरी