शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

ड्रोन-जेटची टक्कर थोडक्यात टळली

By admin | Updated: March 20, 2016 03:47 IST

लुफ्थहंसा एअरलाईनचे जेट विमान आणि ड्रोन यांची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक टक्कर थोडक्यात टळली. यावेळी ड्रोन विमान जेटपासून २०० फूट अंतरावर होते.

लॉस एंजिल्स : लुफ्थहंसा एअरलाईनचे जेट विमान आणि ड्रोन यांची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक टक्कर थोडक्यात टळली. यावेळी ड्रोन विमान जेटपासून २०० फूट अंतरावर होते. मानवी विमाने आणि मानवरहित ड्रोन यांच्यातील अपघात टळण्याची ही आणखी एक ताजी घटना आहे.लुफ्थहंसा एअरलाईन्सचा वैमानिक ए-३८० हे जेट विमान विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असतानाच स्थानिक वेळेनुसार दुपारी १-३० वाजता ड्रोन विमान त्याच्या विमानाकडे येताना दिसले, असे फेडरल उड्डयन प्रशासनाच्या एका प्रवक्त्याने सांगितले. हा प्रकार घडला त्यावेळी जेट विमान पाच हजार फूट उंचीवर होते आणि विमानतळापासून पूर्वेला १४ मैल अंतरावर होते. विमानतळाच्या या दिशेला घनदाट लोकवस्ती असलेली उपनगरे आहेत. या भागावर विमानांची टक्कर झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेबाबत लुफ्थहंसा एअरलाईन्सचा प्रवक्ता लगेचच प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. सध्या मानवरहित ड्रोन विमाने लोकप्रिय असून असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. (वृत्तसंस्था)त्यामुळे पोलिसांना अशा ड्रोन विमानांच्या हालचालींवर लक्ष्य ठेवण्यास सांगण्यात आले आहे, पण ही ड्रोन विमाने कोठून उतरतात, कोठून उड्डयन करतात हे समजत नाही. (वृत्तसंस्था)गेल्या वर्षी कॅलिफोर्नियातील प्रशासनाने ड्रोन विमानांच्या उड्डयनावर निर्बंध घालणारे व त्यासाठी परवानगी आवश्यक असणारे विधेयक मांडले होते. यापूर्वी घडलेल्या अशा घटना ध्यानात घेऊन ते मांडण्यात आले होते. ताज्या घटनेत विमान आणि ड्रोन यांची टक्कर झाली असती तर मोठीच हानी झाली असती. हे आम्हाला कधीही मान्य होणार नाही, असे एका प्रवक्त्याने सांगितले.ड्रोन हे पक्ष्याप्रमाणे विमानाच्या इंजिनात घुसले तर इंजिन बिघडते आणि विमान दुर्घटनाग्रस्त होऊ शकते, त्यामुळे सरकार आणि उद्योगक्षेत्रात अशा घटनांवर तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत ड्रोन आणि प्रवासी विमान यांच्यात थेट टक्कर होऊन अपघात झाला नसला तरीही अपघात थोडक्यात टळण्याच्या २४१ घटना घडल्या आहेत.