बर्लिनमध्ये कारस्फोटात ड्रायव्हरचा मृत्यू
By Admin | Updated: March 15, 2016 16:47 IST2016-03-15T16:47:37+5:302016-03-15T16:47:37+5:30
कारमध्ये झालेल्या स्फोटात एका ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सिटी सेंटरच्या दिशेने ही कार चालली असताना हा स्फोट झाला आहे

बर्लिनमध्ये कारस्फोटात ड्रायव्हरचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत -
बर्लिन, दि. १५ - कारमध्ये झालेल्या स्फोटात एका ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सिटी सेंटरच्या दिशेने ही कार चालली असताना हा स्फोट झाला आहे. स्फोट इतका जबरदस्त होता की कार पुर्ण हवेत उडाली असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. गाडीमध्ये बॉम्ब किंवा स्फोटक ठेवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळे हा स्फोट झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पोलिसांनी जवळ राहणा-या लोकांना खिडक्या बंद करण्याच्या तसंच घरातून बाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत. अजून स्फोट होण्याची शक्यता बॉम्बशोधक पथकाने नाकारली आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.
आम्ही तपासाच्या सुरुवातीला आहोत त्यामुळे सध्या या स्फोटामागचं नेमक कारण सांगू शकत नसल्याचं पोलीस अधिकारी मायकल यांनी सांगितलं आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. कारची व्यवस्थित तपासणी केल जात आहे. प्रत्येक संशयित गोष्टीचा तपास करण्यात येईल अशी माहिती मायकल यांनी दिली आहे