शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

टोल रोडवरून वारंवार जाणं पडलं महाग, खात्यातून दणक्यात उडाले 43 लाख रुपये अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 18:22 IST

जेसन क्लॅंटनच्या खात्यातून दर वेळी  सुमारे 75 हजार रुपये कापले गेले. ट्रान्सपोर्ट एजन्सीने एकदा तर त्याच्याकडून तब्बल 13 लाख रुपये वसूल केले होते.

टोलनाक्यावरून वारंवार जाणाऱ्या ट्रकचालकाच्या खात्यातून सुमारे 43 लाख रुपये शुल्क कापण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खरे तर, ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या चुकीमुळे हा प्रकार घडला. ट्रक चालकाने त्याचे पैसे परत मागितले असता त्याला खात्यात पैसे रिफंड करण्यास नकार देण्यात आला आणि क्रेडिट नोट घेण्यास सांगण्यात आले.

हे प्रकरण ऑस्ट्रेलियातील आहे. येथील न्यू साउथ वेल्समधील टोल रोडवरून जाताना जेसन क्लॅंटनच्या खात्यातून दर वेळी  सुमारे 75 हजार रुपये कापले गेले. ट्रान्सपोर्ट एजन्सीने एकदा तर त्याच्याकडून तब्बल 13 लाख रुपये वसूल केले होते. यासंदर्भात, आपण क्लेंटनचे पैसे क्रेडिट नोटच्या माध्यमाने परत करू, असे स्टेट ट्रांसपोर्ट आणि रोड एजन्सीने म्हटले आहे.

मात्र, ट्रक ड्रायव्हरने ट्रांसपोर्ट एजन्सीची ही ऑफर धुडकावली आहे. ऑस्ट्रेलियाच्या 2GB रेडिओशी बोलताना जेसन क्लेंटन म्हणाले, न्यू साउथ वेल्स आणि ई-टोलने माझ्यासोबत अत्यंत घाणेरड्या प्रकारची मजाक केली आहे. मी पूर्णपणे निराश झालो आहे. क्रेडिट नोट हा पर्याय माझ्यासाठी अजिबात योग्य नाही.

ज्या लोकांकडून टोल रोड वापरल्याबद्दल चुकून रेग्युलर चार्जच्या डबल पैसे वसूल केले गेले, त्या 45,000 लोकांपैकी एक क्लेंटनही आहेत. या प्रकाराबद्दल न्यू साउथ वेल्स ट्रांसपोर्ट चीफ ऑपरेशन ऑफिसर हावर्ड कॉलिन्स यांनी माफीही मागितली आहे. तसेच ज्या ड्रायव्हर्सकडून अधिकचे पैसे वसूल केले गेले त्या सर्वांना संस्था रिफंड करेल, असे म्हटले आहे.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाtollplazaटोलनाका