शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Imran khan: गरज सरो! पाकिस्तानचा अण्वस्त्र जन्मदाता मरणाच्या दारात; इम्रान खानने विचारले पण नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 12:42 IST

Dr Abdul Qadeer khan Death Rumors: अब्‍दुल कादिर यांनी डॉनला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान सरकारवर आरोप केला आहे. परिस्थिती एवढी वाईट झाली की, अब्‍दुल कादिर खान यांना व्हिडीओ जारी करून जिवंत असल्याचे सांगावे लागले.

इस्‍लामाबाद : जगभरात बदनाम असलेले आणि अणुबॉम्बचे तंत्रज्ञान चोरलेले पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक अब्‍दुल कादिर खान (Abdul Qadeer khan) यांना आता पश्चाताप होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे ते मरायला टेकले होते, हॉस्पिटलमध्ये असताना त्यांची पंतप्रधान इम्रान खाननेच (Imran khan) नाही तर सरकारमधील एकाही माणसाने साधी विचारपूसही केली नाही. यामुळे अब्दुल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Dr Abdul Qadeer disappointed with PM Imran for not inquiring after his health)

अब्‍दुल कादिर यांनी डॉनला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान सरकारवर आरोप केला आहे. मी देशाच्या संरक्षणासाठी एवढे केले परंतू मी मरणाच्या दारात असताना इम्रान खाननेची नाही तर मंत्रिमंडळातील एकानेही माझी साधी विचारपूसही केली नाही. सर्व देश माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होता, शुक्रवारी तर माझा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याचे ते म्हणाले. 

परिस्थिती एवढी वाईट झाली की, अब्‍दुल कादिर खान यांना व्हिडीओ जारी करून जिवंत असल्याचे सांगावे लागले. कोरोनामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पाकिस्तानचे विरोधी पक्ष नेते शहबाज शरीफ यांनी अब्‍दुल कादिर खान यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. 

पाकिस्तानच्या अणुबॉम्ब निर्माण कार्यक्रमाचे जनक राहिलेल्या कादिर खानना अण्वस्त्रे प्रसाराचे आरोप झाल्याने पदावरून हटविण्यात आले होते. 1998 मध्ये पाकिस्तानने भारताशी स्पर्धा करण्यासाठी पहिल्यांदा अणुबॉम्बची चाचणी घेतली होती. पदावरून हटविल्यानंतर खान यांना पाकिस्तानने मोठी सुरक्षा देत साऱ्या घडामोडींपासून बाजुला केले होते. ते आजपर्यंत दुर्लक्षितच आहेत. कादिर खानने इराण, लिबिया आणि उत्तर कोरियासारख्या देशांना अणुबॉम्ब बनविण्याचे तंत्रज्ञान दिले होते. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान