शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

चीनचा ऑक्सिजन भारताला नकोच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 04:36 IST

भारताचे माैन : अन्य देशांकडे पुरवठ्याबाबत चाैकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवरनवी दिल्ली/बीजिंग : कोविड-१९ साथीच्या उद्रेकाचा सामना करणाऱ्या भारतास ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्याची तयारी चीनने दाखविली आहे. मात्र, भारताने चीनच्या प्रस्तावास अद्याप होकार दिलेला नाही. ऑक्सिजनसाठी भारताचा इतर देशांकडे शोध सुरू आहे.

ऑक्सिजनच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर भारत आता इतर देशांकडून मदत घेण्याच्या तयारीत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने मागील आठवड्यात म्हटले होते. त्यानंतर चीनने मदत देण्याची तयारी दर्शविली होती. तथापि, भारत सध्या तरी चीनकडून ऑक्सिजन अथवा इतर मदत घेणार नाही, असे समजते.  

चीनऐवजी सिंगापूर आणि आखाती देशांकडून ऑक्सिजन मिळविता येऊ शकतो का, हे भारत तपासून पाहत आहे. भारत ज्या देशांकडून मदत घेणार आहे, त्या देशांच्या यादीत चीनचा समावेश नाही, असे सूत्रांनी सांगितले.

चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटले आहे की, कोरोना हा संपूर्ण मानवजातीचा शत्रू असून त्याच्या मुकाबल्यासाठी आंतरराष्ट्रीय एकजूट आणि परस्पर सहकार्य आवश्यक आहे. भारतातील कोरोना स्थितीवर चीनचे लक्ष असून वैद्यकीय उपकरणांच्या टंचाईची आम्ही दखल घेतली आहे. या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीन भारताला शक्य ती मदत करण्यास तयार आहे. भारताने गेल्यावर्षी चीनकडून वैद्यकीय उपकरणे मागवली होती. तथापि, यातील बहुतांश आयात ही व्यावसायिक करारानुसार करण्यात आली होती. गेल्या वर्षांपासून भारत आणि चीन यांचे संबंध बिघडले आहेत. गतवर्षी चीनने प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक संघर्षही झडला होता. फ्रान्सचीही तयारीफ्रान्सनेही भारताला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतासोबत आम्ही बंधुभाव व्यक्त करीत आहे. या संघर्षात आम्ही तुमच्यासोबत आहोत. सर्व प्रकारची मदत करण्यास आम्ही तयार आहोत.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या