डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर घेतले १२ कोटींना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 01:39 IST2017-03-30T01:39:41+5:302017-03-30T01:39:41+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राहत असलेले त्यांचे बालपणातील घर एका अज्ञात व्यक्तीने १२ कोटी रुपयांना घेतले

Donald Trump's own childhood home has taken 12 crores | डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर घेतले १२ कोटींना

डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर घेतले १२ कोटींना

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राहत असलेले त्यांचे बालपणातील घर एका अज्ञात व्यक्तीने १२ कोटी रुपयांना घेतले आहे. हे घर न्यूयॉर्कमध्ये आहे. १९४० मध्ये हे घर ट्रम्प यांचे वडील फ्रेड यांनी बांधले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जन्म प्रमाणपत्रावर याच घराचा उल्लेख आहे. ट्रम्प हे लहानपणी चार वर्षे या घरात राहिले. ट्रम्प स्वत: एक रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. कमी किमतीतील अनेक घरे त्यांनी उभारली आहेत. ट्रम्प हे १९५१ मध्ये नव्या मोठ्या घरात स्थलांतरित झाले. या जुन्या घरात ट्रम्प राहिल्यामुळे त्याची किंमत १८ कोटींपर्यंत येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. येथील रहिवासी हे घर आॅक्टोबरमध्येच विकू इच्छित होते; पण नोव्हेंबरमधील निवडणुकीत ट्रम्प जिंकले तर घराची किंमत अधिक येईल, असा आडाखा बांधून हे घर तेव्हा विकण्याचा निर्णय मागे घेण्यात आला होता. आता या घराची विक्री करण्यात आली आहे.

Web Title: Donald Trump's own childhood home has taken 12 crores