शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांचे H-1B व्हिसा धोरण; लाखो भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा, नोकऱ्या जाणार..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 19:27 IST

अमेरिकेत काम करण्यासाठी H-1B व्हिसा अतिशय महत्वाचा आहे. हा व्हिसा मिळवण्याचे हजारो भारतीयांचे स्वप्न आहे.

अमेरिकेत काम करण्यासाठी H-1B व्हिसा अतिशय महत्वाचा आहे. हा व्हिसा मिळवण्याचे हजारो भारतीयांचे स्वप्न आहे. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन प्रशासनात अनेक भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत, त्यापूर्वीच अनेक अमेरिकन कंपन्यांनी भारतीयांना दिलेल्या नोकरीच्या ऑफर्सही रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, अमेरिकेत शिक्षण घेण्याच्या विचारात असलेल्या विद्यार्थ्यांनाही मोठा धक्का बसू शकतो. 

H-1B व्हिसा प्रोग्राम हा यूएसमधील परदेशी लोकांसाठी सर्वात मोठा तात्पुरता वर्क व्हिसा आहे. 2023 च्या प्यू रिसर्चच्या अहवालात असे दिसून आले आहे की, अमेरिकेत इमिग्रेशन 16 लाखांनी वाढले आहे, जी गेल्या दोन दशकांतील सर्वात मोठी वाढ आहे. यामागे अनेक अमेरिकन लोकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वीच इमिग्रेशन धोरणांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आणि अधिकाधिक अमेरिकन लोकांना कामावर घेण्याचे आश्वासन दिले आहे. इमिग्रेशन व्यवस्थेवरील वादामुळे अमेरिकेतील सर्वात जास्त H-1B व्हिसाधारक असलेल्या भारतीयांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा H-1B व्हिसा कार्यक्रम कुशल कामगारांना अमेरिकेत आणण्यासाठी तयार करण्यात आला होता. अमेरिकन कामगारांना कमी लेखणारा हा कार्यक्रम असल्याची ट्रम्प समर्थकांमध्ये चर्चा आहे. या कार्यक्रमात भारतीयांचे वर्चस्व आहे. 72% H-1B व्हिसाधारक भारतीय, तर 12% चिनी नागरीक आहेत. आता ट्रम्प प्रशासनात फक्त अमेरिकेत जाण्याच्याच्या विचारात असलेल्यांना अडचण येणार नाही, तर तिथे राहणाऱ्या लोकांच्या नोकरीवरही धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. सध्या अमेरिकन विद्यापीठांमध्ये भारतातील 250,000 हून अधिक विद्यार्थी आहेत. मात्र, आता कडक अंमलबजावणीमुळे रोजगाराची चिंता निर्माण झाली आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारत