डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेतील गुप्तचर संस्था व मीडियाला इशारा

By Admin | Updated: January 12, 2017 07:53 IST2017-01-12T07:40:10+5:302017-01-12T07:53:52+5:30

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील गुप्तचर संस्था तसेच मीडियामध्ये सध्या युद्ध सुरू असल्याचे दिसत आहे.

Donald Trump warns US intelligence agencies and media | डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेतील गुप्तचर संस्था व मीडियाला इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेतील गुप्तचर संस्था व मीडियाला इशारा

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 12 -  अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील गुप्तचर संस्था तसेच मीडियामध्ये सध्या 'युद्ध' सुरू असल्याचे दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतची धक्कादायक गोपनीय माहिती रशियाकडे आहे, असे वृत्त समोर आले आहे. पण, ट्रम्प यांनी हा ‘मूर्खपणा’ असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत येथील गुप्तचर संस्था आणि मीडियाला चांगलंच सुनावले आहे.
 
ट्रम्प यांच्याशी संबंधित गोपनीय माहिती रशियाकडे असल्याचा दावा करणा-या शहरातील मीडिया आणि गुप्तचर संस्थांवर ट्रम्प चांगलेच संतापले असून, याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही ट्रम्प यांनी यावेळी दिला आहे.  ट्रम्प यांनी सीएनएन, न्यू यॉर्क टाइम्स सारख्या वृत्तसंस्थांचा अपमानही केला. यावेळी सीएनएनचे रिपोर्टर आणि ट्रम्प यांच्यात वाक् युद्धदेखील झाले. ट्रम्प यांनी त्यांच्या न्यूज नेटवर्कच्या बातमीला 'बनावट' सांगत त्यांच्यावर टीकाही केली. तसेच ट्रम्प यांनी 'बजफीड' या वेबसाइटवरील वादग्रस्त अहवालाचा उल्लेख 'कचरा' असे केला. 
 
एफबीआय आणि सीआयएसह अमेरिकेतील चार प्रमुख गुप्तचर एजन्सींनी ट्रम्प आणि ओबामा यांच्या समोर गत आठवड्यात एक अहवाल सादर केला. अध्यक्षांच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाबाबतचा हा अहवाल असल्याचे सांगितले जाते.  वॉशिंग्टन पोस्टने याबाबत वृत्त दिल्यानंतर ट्रम्प यांनी व्टिट केले आहे की, हे वृत्त खोटे असून पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे. एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाने दोन्ही मुख्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्याबाबत अडचणी निर्माण होतील, अशी माहिती जमा केली होती.
 
पण, हिलरी क्लिंटन अडचणीत येतील अशीच माहिती समोर आणण्यात आली. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, मोहिमेत ट्रम्प यांचे प्रतिनिधी आणि रशिया सरकारचे मध्यस्थ यांच्यात माहितीचे आदान प्रदान होत होते. पण, ट्रम्प यांनी ही बनावट सामुग्री असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Donald Trump warns US intelligence agencies and media