शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'इराणला कधीही अण्वस्त्र तयार करू देणार नाही', डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा; केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 14:31 IST

Donald Trump warns Iran: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.

Donald Trump warns Iran: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. वॉशिंग्टन डी.सी. येथे काँग्रेसला संबोधित करताना आपल्या वार्षिक स्टेट ऑफ द युनियन भाषणात त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही. ट्रम्प यांनी दावा केला की, यापूर्वी झालेल्या अमेरिकी लष्करी कारवायांमुळे इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम जवळपास उद्ध्वस्त झाला होता, मात्र आता तेहरान पुन्हा त्याच दिशेने हालचाली करत असल्याची चिन्हे दिसत आहेत.

अमेरिकेपर्यंत पोहोचू शकणाऱ्या मिसाइल्स...

इराणकडून निर्माण होत असलेल्या धोक्याबाबत इशारा देताना ट्रम्प म्हणाले की, इराणने अशा क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे, जी युरोप तसेच परदेशातील अमेरिकन लष्करी तळांसाठी गंभीर धोका ठरू शकतात. इतकेच नव्हे, तर इराण लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर काम करत असून, भविष्यात ती थेट अमेरिकेपर्यंत पोहोचू शकतात, असा दावाही त्यांनी केला.

‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’चा उल्लेख

अमेरिकेची रणनीती स्पष्ट असल्याचे सांगत ट्रंप म्हणाले, Peace Through Strength, म्हणजेच मजबूत लष्करी ताकदीद्वारे शांती राखणे, हीच आमची नीती आहे. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात मागील वर्षी इस्रायल-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अमेरिकन हवाई हल्ल्यांचाही उल्लेख केला. ही कारवाई ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’ म्हणून ओळखली जाते.

त्यांच्या म्हणण्यानुसार, या कारवाईनंतर इराणला स्पष्ट इशारा देण्यात आला होता की, त्यांनी पुन्हा अण्वस्त्र कार्यक्रम सुरू करू नये. मात्र, इराण गुप्तपणे अण्वस्त्र क्षमतेत वाढ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय अजूनही कायम आहे.

युद्ध नाही, करार हवा; पण अट ठाम...

ट्रम्प यांनी असेही स्पष्ट केले की, हा वाद युद्धातून नव्हे तर कूटनीतीतून सोडवण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र त्यांनी एक अटही घातली आहे. इराणने अजूनही उघडपणे हे जाहीर केलेले नाही की, ते कधीही अण्वस्त्र तयार करणार नाही. जोपर्यंत असे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत अमेरिका सावध भूमिका ठेवणार असल्याचे ट्रम्प म्हणाले.

इराणचा पलटवार...

दरम्यान, इराणकडून हे आरोप सातत्याने फेटाळले जात आहेत. इराणचे म्हणणे आहे की, त्यांचा अणुकार्यक्रम फक्त वीज निर्मिती आणि वैज्ञानिक संशोधनासाठी आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, इराणला अण्वस्त्र बनवण्याचा कोणताही इरादा नाही. अमेरिका-इराण यांच्यातील पुढील चर्चा स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे होणार असून, त्या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चर्चा सुरू, पण तणाव कायम

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी चर्चेतून सकारात्मक संकेत मिळत असल्याचे म्हटले असले, तरी देश सर्व परिस्थितींसाठी सज्ज असल्याचा इशाराही त्यांनी दिला. दुसरीकडे, अमेरिकी अधिकाऱ्यांचा दावा आहे की, इराणने युरेनियमचे एनरिचमेंट धोकादायक पातळीपर्यंत नेले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाची चिंता वाढली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील परिस्थिती अधिक संवेदनशील होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump warns Iran: No nuclear weapons, or else, he asserts.

Web Summary : Trump vows to prevent Iran from acquiring nuclear weapons, citing past military actions. He warns of Iranian missiles threatening Europe and potentially the US, while advocating for a diplomatic solution contingent on Iran's denuclearization commitment, despite ongoing tensions and enrichment concerns.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIranइराण