शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

इलॉन मस्क यांच्या पोलनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर हँडल पुन्हा सुरू; पण ट्रम्प म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 08:59 IST

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट कायमचे सस्पेंड करण्यात आले होते.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट कायमचे सस्पेंड करण्यात आले होते. सत्ता परिवर्तनाच्या काळात त्यांच्या ट्विटमुळे लोकांनी व्हाईट हाऊसवर हल्लाबोल केला होता. या निदर्शनात अनेकांचा मृत्यूही झाला. आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. कारण ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी शनिवारी एका ट्विटमध्ये ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा सुरू करायचे का? याबाबतचा पोल घेतला. त्यावर कोट्यवधी लोकांनी आपाल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोलमधील निर्णयानुसार मस्क यांनी टॅम्प यांचं ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू केलं आहे. पण खुद्द ट्रम्प यांनाच ट्विटरवर पुनरागमन करण्यात रस राहिलेला नाही असं सांगण्यात येत आहे. 

इलॉन मस्क यांच्या ट्विटरवर सुमारे १५ कोटी लोकांनी मतदान केलं आहे. स्काय न्यूजनुसार, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा मात्र ट्विटरवर परतण्याचा कोणताही विचार नाही. त्यांनी त्यांच्या नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल' वर राहण्याचा निर्णय घेतला आहे. जरी ट्रम्प यांचे खाते realDonaldTrump ट्विटरवर पुन्हा सुरू केले गेले असले. तरी सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कोणतीही हालचाल दिसून आलेली नाही. जेव्हा मस्क यांनी घेतलेल्या पोलचा निकाल ट्विट केला तेव्हा त्यांनी  ‘Vox Populi, Vox Dei’ या लॅटिन वाक्याचा वापर केला. ज्याचा अर्थ 'लोकांचा आवाज देवाचा आवाज आहे' असा होतो. 

ट्रम्प यांच्या हँडलचं निलंबन नैतिकदृष्ट्या चुकीचंजेव्हा ट्रम्प यांचे ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले तेव्हा ट्विटरनं ट्विटर सेफ्टी अकाऊंटवरून पोस्ट करून त्यामागचं कारण स्पष्ट केलं होतं. यापुढे हिंसाचार भडकू नये म्हणून हे निलंबन करण्यात येत असल्याचं ट्विटरनं म्हटलं होतं. यावर इलॉन मस्क यांनी वर्षाच्या सुरुवातीला कडक शब्दात नाराजी व्यक्त केली होती. ट्रम्प यांच्यावर बंदी घालणे ही 'चूक' होती जे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे, असं मस्क म्हणाले होते. ट्रम्प यांच्या हँडलवरील कारवाईनंतर त्यांनी ट्रुथ सोशल नावाचं स्वत:ची नवी सोशल नेटवर्किंग साइट सुरू केली. जे हुबेहून ट्विटरसारखेच आहे. अगदी ट्विटरची कार्बन कॉपी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटर