Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबाबत दिलेल्या निर्णयावरून पुन्हा एकदा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयावर जोरदार टीका केली आहे. न्यायालयाचा निर्णय “अपमानास्पद” असल्याचे सांगत, या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या अधिकारांमध्ये उलट वाढच झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’ वर पोस्ट करत ट्रम्प यांनी टॅरिफ कायदेशीर मार्गाने लागू करण्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र, त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सुप्रीम कोर्टाचा निर्णय हास्यास्पद- ट्रम्प
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हास्यास्पद, मूर्खतापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत विभाजनकारी निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्ष म्हणून माझी ताकद पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. मी आता ‘लायसन्स’चा वापर करून इतर देशांविरोधात, विशेषतः गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेचा गैरफायदा घेणाऱ्या देशांविरोधात, अत्यंत कठोर पावले उचलू शकतो.
ट्रम्प यांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, न्यायालयाच्या निर्णयानुसार मी इतर देशांकडून लायसन्स फी घेऊ शकत नाही. पण प्रत्येक लायसन्ससोबत शुल्क असते, मग अमेरिका असे का करू शकत नाही? त्यांनी असेही नमूद केले की, न्यायालयाने इतर सर्व टॅरिफना मंजुरी दिली आहे आणि ते टॅरिफ पूर्वी वापरण्यात आलेल्यांपेक्षा अधिक प्रभावी आणि शक्तिशाली पद्धतीने लागू करता येऊ शकतात.
ट्रम्प यांची तात्काळ कारवाई: ग्लोबल टॅरिफ वाढवला
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर ट्रम्प यांनी तात्काळ 10 टक्के ग्लोबल टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शनिवारी(21 फेब्रुवारी 2026), ट्रम्प यांनी हा ग्लोबल टॅरिफ 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जागतिक व्यापार धोरणावर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर काय परिणाम होतो, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Donald Trump criticizes the Supreme Court's tariff decision as "insulting," claiming it strengthens his presidential power. He vows to legally impose tariffs, potentially increasing global tariffs to 15%, impacting global trade relations.
Web Summary : डोनाल्ड ट्रंप ने टैरिफ पर सुप्रीम कोर्ट के फैसले को 'अपमानजनक' बताया, कहा इससे राष्ट्रपति के अधिकार बढ़े। उन्होंने कानूनी रूप से टैरिफ लगाने की बात कही और वैश्विक टैरिफ को 15% तक बढ़ाने की घोषणा की, जिससे वैश्विक व्यापार प्रभावित हो सकता है।