दावोस - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे पीस बोर्डाच्या स्थापना सनदेवर स्वाक्षरी केली. युद्ध रोखण्यासाठी ट्रम्प यांनी बोर्ड ऑफ पीस लॉन्च केले आहे. याचा मुख्य हेतू गाझामध्ये शांतता प्रस्थापित करणे हा आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं. या बोर्ड ऑफ पीसवर एकूण २२ देशांनी स्वाक्षरी केली आहे.
बोर्ड ऑफ पीसवर स्वाक्षरी करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, बहरीन, मोरक्को, अर्जेंटिना, आर्मेनिया, अझरबैझान, बेल्झियम, इजिप्त, हंगेरी, इंडोनेशिया, जॉर्डन, कझाकस्तान, कोसोवो, मंगोलिया, पाकिस्तान, पराग्वे, कतार, सौदी अरेबिया, तुर्की, संयुक्त अरब अमिराती आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. या बोर्डात आठ इस्लामिक देश आहेत. तर दुसरीकडे फ्रान्स, नॉर्वे, स्लोवेनिया, स्वीडन आणि ब्रिटन यांनी या बोर्डात सहभागी होण्यास नकार दिला. याशिवाय अन्य देशांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही.
या स्वाक्षरी समारंभातील शहबाज शरीफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात शहबाज ट्रम्प यांच्या कानात काहीतरी सांगताना आणि ट्रम्प शरीफ यांच्या हात पकडलेले दिसून येतात. व्हाइट हाऊसने या बोर्डात सहभागी होण्यासाठी ६० देशांना आमंत्रित केले होते. त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशिवाय यूएई, अर्जेटिना, सौदी अरेबिया आणि कतारसारख्या देशांचे नेते होते. भारताकडून यावेळी कुणीही सहभागी नव्हते. ट्रम्प यांनी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये गाझा युद्ध संपवण्याचं प्लॅनिंग करत बॉर्ड ऑफ पीस बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अमेरिकेने त्यासाठी जवळपास ६० देशांना या बोर्ड ऑफ पीसमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले होते.
या बोर्ड ऑफ पीसच्या मसुद्यात म्हटलंय की, ज्या देशाला ३ वर्ष किंवा त्याहून अधिक या बोर्डाचे सदस्य बनायचे असेल त्यांनी १ अब्ज डॉलरचं योगदान द्यायला हवे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे बोर्डाचे अध्यक्ष राहतील. सुरुवातीला हे बोर्ड गाझा येथे शांतता बहाल करण्याच्या दिशेने काम करेल परंतु त्यानंतर जागतिक स्तरावर अनेक मुद्द्यांवर हे एकत्र काम करतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील ५ स्थायी सदस्यांमधील अमेरिका वगळता कुठलाही देश आतापर्यंत या बोर्डात सहभागी झाला नाही.
Web Summary : At Davos, Trump launched the 'Board of Peace' to prevent war, focusing initially on Gaza. Twenty-two nations, including Pakistan, signed the charter. The board aims to foster global peace, with member nations contributing $1 billion. Notably, India isn't participating; some Western countries declined.
Web Summary : दावोस में, ट्रम्प ने युद्ध रोकने के लिए 'बोर्ड ऑफ पीस' लॉन्च किया, जो शुरू में गाजा पर केंद्रित है। पाकिस्तान सहित बाईस देशों ने चार्टर पर हस्ताक्षर किए। बोर्ड का लक्ष्य वैश्विक शांति को बढ़ावा देना है, सदस्य राष्ट्र 1 बिलियन डॉलर का योगदान करते हैं। भारत भाग नहीं ले रहा है; कुछ पश्चिमी देशों ने इनकार कर दिया।