अमेरिकेच्या सीमेजवळ होऊ शकतो मोठा दहशतवादी हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भीती व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 01:11 PM2024-01-29T13:11:50+5:302024-01-29T13:14:51+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सीमेजवळ मोठा दहशतवादी हल्ला होण्याची दाट भीती व्यक्त केली आहे.

donald trump says major terrorist attack will happen in america over us mexico border | अमेरिकेच्या सीमेजवळ होऊ शकतो मोठा दहशतवादी हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भीती व्यक्त

अमेरिकेच्या सीमेजवळ होऊ शकतो मोठा दहशतवादी हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भीती व्यक्त

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे विधान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सीमेवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, तीन वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकेच्या सीमा मजबूत होत्या, पण आता आपत्तीची प्रतीक्षा आहे, सीमा तितक्या सुरक्षित नाहीत. मोठे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अमेरिकेच्या सीमा खुल्या जखमेसारख्या आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सीमेजवळ मोठा दहशतवादी हल्ला होण्याची दाट भीती व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. यामागील कारण देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'अमेरिका आणि मेक्सिको सीमेबाबत करण्यात येत असलेला करार विध्वंस आणू शकतो. तसेच, अमेरिकेची दक्षिण सीमा जगाच्या इतिहासातील सर्वात वाईट असल्याचे सांगत अमेरिकेत मोठा दहशतवादी हल्ला होण्याची भीती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली.

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले की, "तीन वर्षांपूर्वीपर्यंत आमच्या सीमा इतिहासातील सर्वात मजबूत आणि सुरक्षित होत्या, परंतु आज असे दिसते की सीमेवर आपत्ती वाट पाहत आहे. ही सर्वात भीषण आपत्ती आहे. जगाच्या इतिहासात सीमा वाईट आहेत आणि त्या आपल्या देशासाठी खुल्या जखमा आहेत. जगभरातून दहशतवादी कोणत्याही तपासाशिवाय आपल्या देशात प्रवेश करत आहेत. अमेरिकेत सीमेजवळ मोठा दहशतवादी हल्ला होण्याची 100 टक्के शक्यता आहे."

डोनाल्ड ट्रम्प यांचे खासदारांना आवाहन
एकीकडे, अमेरिका आणि मेक्सिको यांच्या सीमेवर झालेल्या कराराबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन संसदेत भाष्य करत आहेत. तर दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांना कोणत्याही या करारामध्ये सहभागी न होण्याचे आवाहन करत आहेत. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या निर्वासितांच्या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतही बेकायदेशीर निर्वासितांचा मुद्दा समोर येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून ज्यो बायडन यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी डोनाल्ड ट्रम्प सोडणार नाहीत, असे दिसते.

Web Title: donald trump says major terrorist attack will happen in america over us mexico border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.