शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 12:22 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध घेत आहेत. या औषधावरून अमेरिकेत झालेले वाद निरर्थक असल्याचेही ते म्हणाले होते.

वॉशिंग्टनः कोरोना विषाणूचं थैमान दिवसेंदिवस वाढत असून, अनेक देश त्यावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप त्यावर कोणतीही लस तयार झालेली नाही. अमेरिका, रशिया सारख्या महासत्तांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलेलं आहे. विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध घेत आहेत. या औषधावरून अमेरिकेत झालेले वाद निरर्थक असल्याचेही ते म्हणाले होते.वॉशिंग्टनमध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, गेल्या दीड आठवड्यापासून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध घेण्यास मी सुरुवात केली आहे. या गुणकारी औषधाबाबत अनेक चांगल्या गोष्टी मी ऐकल्या आहेत. हे औषध घेतल्याने अमुक एक दुष्परिणाम होतील असे जे बोलले जाते त्यात तथ्य नाही. मी हे औषध घेतल्यानंतरही धडधाकट आहे. तुमच्यासमोर उभा आहे, असेही ते म्हणाले होते. 

दरम्यान, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुरस्कार केल्याने डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते चक स्कमर यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी विशिष्ट औषधामुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध करता येतो असे सांगून विनाकारण आशा पल्लवित केल्या आहेत. ट्रम्प करत असलेली कृती भयंकर आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध आपल्याला देण्यात यावे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील डॉक्टरना सांगितले होते. ट्रम्प यांच्या म्हणण्याला डॉक्टरांनी एका पत्रकाद्वारे दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची रोज कोरोना चाचणी केली जाते. या विषाणूचा त्यांना संसर्ग झालेला नसल्याचा निष्कर्ष त्यातून आला आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध ४० वर्षांपासून मलेरिया व इतर आजारांवर घेतले जाते. संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी हे औषध घेत आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.तज्ज्ञ म्हणतात हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर धोकादायकमिलर फॅमिली हार्ट संस्थेचे मुख्य शैक्षणिक अधिकारी डॉ. स्टीव्हन ई. निसेन म्हणाले की, हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या अतिवापरामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्याचवेळी हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील प्रोफेसर डॉ. स्कॉट सोलोमन यांनीही याला प्राणघातक म्हटले आहे. काही आरोग्यतज्ज्ञांच्या मते हे औषध हृदय, मूत्रपिंड आणि यकृतावर परिणाम करते.एफडीएनेही दिला इशारामहिनाभरापूर्वी अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाने असा इशारा दिला होता की, कोरोना प्रतिबंधात हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर करू नये. कोरोना रुग्णांच्या उपचारांमध्ये हे औषध किती प्रभावी आहे याचा ठोस पुरावा नाही. ट्रम्प यांच्याआधी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनारो यांनीही या औषधाला पाठिंबा दर्शविला होता.

हेही वाचा

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात 6 कोटी लोक गरिबीच्या विळख्यात सापडणार

Coronavirus: अहो आश्चर्यम्! फक्त दोन वेदनाशामक औषधं घेऊन रुग्ण झाले ठणठणीत, प्रशासनही आश्चर्यचकीत

भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही; कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्या