शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

'...तर तुमच्यावर 100% शुल्क लावणार', डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह सर्व BRICS देशांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:34 IST

Donald Trump on BRICS : ब्रिक्समधील अतिमहत्त्वाचा देश असलेल्या भारताने काय भूमिका घेतली? पाहा...

Donald Trump on BRICS : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ब्रिक्स देशांना मोठा इशारा दिला आहे. 'ब्रिक्स देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकन डॉलरऐवजी अन्य कोणतेही चलन वापरण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर 100 टक्के शुल्क आकारले जाईल', असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे हा इशारा दिला.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणतात, 'ब्रिक्स देश डॉलरला पर्याय शोधणार आणि आम्ही फक्त पाहत बसायचे, ते दिवस गेले आता. आम्हाला ब्रिक्स देशांकडून शब्द हवाय की, ते नवीन ब्रिक्स चलन तयार करणार नाहीत किंवा अमेरिकन डॉलरच्या जागी इतर कोणत्याही चलनाला समर्थन देणार नाहीत. असे केल्यास, त्यांना 100 टक्के टॅरिफचा सामना करावा लागेल किंवा वाढणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेपासून दूर राहावे लागेल,' अशा शब्दात ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना खडसावले.

BRICS देशात भारताचा समावेशBRICS ही ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या दहा देशांची आंतरसरकारी संघटना आहे. 2009 मध्ये स्थापन झालेल्या BRICS हा एकमेव मोठा आंतरराष्ट्रीय गट आहे, ज्याचा अमेरिका भाग नाही. गेल्या काही वर्षांत ब्रिक्समधील देश, विशेषतः रशिया आणि चीन, अमेरिकन डॉलरला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारताची काय भूमिका?

ब्रिक्सचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या भारताने 'डी-डॉलरायझेशन' (जागतिक व्यापार आणि आर्थिक व्यवहारांमध्ये डॉलरच्या वापरात लक्षणीय घट) च्या विरोधात भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी डिसेंबरमध्ये सांगितले होते की, भारत कधीही 'डी-डॉलरीकरण'च्या बाजूने नाही आणि ब्रिक्स चलन तयार करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतchinaचीनrussiaरशिया