शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

कोरोना, हाँगकाँगवरून चीनविरोधात अमेरिकेची आरपारची तयारी, ट्रम्प आठवडाभरात घेणार मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 11:56 IST

कोरोनाचे संकट असतानाच आता चीनने हाँगकाँगवर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी नवा कायदा आणल्याने अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

वॉशिंग्टन - कोरोना विषाणूबाबत जगाला बरेच दिवस अंधारात ठेवल्याने सध्या चीनला जगातील अनेक देशांकडून टीकेचे लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेली अमेरिकाहीचीनविरोधात आक्रमक झाली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट असतानाच आता चीनने हाँगकाँगवर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी नवा कायदा आणल्याने अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. चीनने हाँगकाँगमध्ये जे काही सुरू केले आहे ते योग्य नाही आम्ही याविरोधात लवकरच योग्य तो निर्णय घेणार आहोत, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.  

व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले की, ‘’हाँगकाँगमध्ये चीन जे काही करत आहे ते योग्य नाही आहे. आम्ही लवकरच यावर योग्य तो निर्णय घेऊ. तुम्हाला याबाबतची माहिती लवकरच मिळेल, कदाचित याच आठवड्यात. आम्ही चीनला जोरदार उत्तर देऊ.’’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प कोरोना विषाणू आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीवरून आधीच चीनवर संतप्त झालेले आहेत. अमेरिकेत पसरलेल्या कोरोना विषाणूसाठी ट्रम्प यांनी चीनला जबाबदार धरले आहे. तसेच निवडणुकीत आपल्याला पराभूत करण्यासाठीची ही चीनची चाल असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  

   दरम्यान, सध्या चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची संसद सुरू आहे. या संसदेत चीनसंदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच यादरम्यान, हाँगकाँगमध्ये लागू करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण कायद्याबाबतही चर्चा झाली आहे. तसेच हा कायदा या महिना अखेरीस लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच हाँगकाँगमध्ये या कायद्याविरोधात मोठे आंदोलन झाले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या   

शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई 

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती 

हाँगकाँगमधील कुठल्याही व्यक्तीने चीनमध्ये कुठलाही अपराधे केल्यास तपासासाठी त्याचे प्रत्यार्पण करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. यापूर्वी या कायद्यात ही तरतूद नव्हती. याशिवाय जर कुठल्याही व्यक्तीने राष्ट्रीय प्रतीकांसोबत छेडछाड केली किंवा एखाद्या व्यक्तीचे कुठलेही कृत्य प्रशासनाला राष्ट्रविरोधी वाटले तर त्लाया तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकेल. मात्र हाँगकाँगने हा कायदा लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीन