शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचा खळबळजनक दावा! म्हणे, 'इराणच अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, म्हणून आम्ही इस्रायलला हल्ल्यासाठी भाग पाडले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 02:46 IST

Donald Trump Iran attack claim:

वॉशिंग्टन: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्ध आता एका नवीन वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराण लवकरच अमेरिकेवर मोठा हल्ला करण्याची योजना आखत होता. त्यामुळेच अमेरिकेने खबरदारी म्हणून इस्रायलला तेहरानवर हल्ले करण्यास भाग पाडले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

ट्रम्प यांच्या मते, मध्यस्थीने सुरू असलेल्या चर्चेची दिशा पाहता, इराण अमेरिकेवर हल्ल्याची तयारी करत असल्याची त्यांना खात्री होती. जरी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी असा कोणताही धोका नसल्याचे म्हटले होते, तरीही ट्रम्प यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. जेव्हा ट्रम्प यांना विचारण्यात आले की, इस्रायलने त्यांच्यावर हल्ल्यासाठी दबाव आणला होता का? त्यावर ट्रम्प म्हणाले, "नाही, उलट कदाचित मीच त्यांना (इस्रायलला) हल्ल्यासाठी भाग पाडले असावे."

इराणच्या नेतृत्वावर भाष्यअयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणचे नेतृत्व कोणाकडे असावे, यावर ट्रम्प म्हणाले की, निर्वासित राजपुत्र रेझा पहलवी यांच्याऐवजी इराणच्या आतूनच कोणीतरी नेतृत्व करावे. "आम्हाला असा नेता नको आहे जो खामेनेईंइतकाच वाईट असेल," असेही त्यांनी नमूद केले.

स्पेन आणि ब्रिटनवर संतापस्पेनने इराणवरील हल्ल्यासाठी आपले लष्करी तळ वापरण्यास अमेरिकेला नकार दिला आहे. यामुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी स्पेनसोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. तसेच ब्रिटनच्या अशाच प्रकारच्या भूमिकेवर त्यांनी टीका केली आहे. स्पेनने आणि ब्रिटनने अमेरिकेविरोधात उघड भूमिका घेतली आहे. 

स्पेनशी व्यापार तोडणार?ट्रम्प यांनी अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांना स्पेनसोबतचे सर्व करार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. "स्पेनची वागणूक अत्यंत वाईट आहे, आम्हाला त्यांच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही," असे ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump claims Iran planned US attack; forced Israel to strike.

Web Summary : Trump alleges Iran planned a US attack, prompting him to push Israel for preemptive strikes. He criticized Iran's leadership succession, threatened Spain and Britain for denying military access, and ordered trade severed with Spain.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणIsraelइस्रायल