शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाचे ढग! इराणच्या जहाजांनी त्रास दिल्यास ती उडवून द्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या नौदलाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 20:09 IST

इराणच्या नौदलानं समुद्रात आपल्या जहाजांना त्रास दिल्यास सर्व इराणी गनबोटांना उडवून द्या, अशी सूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नौदलाला केली आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्धावरून चीनला इशारा दिलेला असतानाच आता आपल्या नौदलाला इराणची बोट पाहिल्यास ती उडवून देण्यास सांगितले आहे. ट्विट करत त्यांनी या आदेशाची माहिती दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, इराणच्या नौदलानं समुद्रात आपल्या जहाजांना त्रास दिल्यास सर्व इराणी गनबोटांना उडवून द्या, अशी सूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नौदलाला केली आहे.विशेष म्हणजे 3 जानेवारी 2020 रोजी अमेरिकेने हवाई हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांना ठार केले होते. त्यानंतर इराण आणि अमेरिकेत तणाव वाढला आहे. दोन्ही देश एकमेकांचे शत्रू बनले आहेत. अमेरिकेच्या या पावलानंतर इराणनेही अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता आणि त्यात 80 लोक ठार झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर अमेरिकेने सांगितले की, सर्व काही सुरक्षित आहे आणि कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. अमेरिकी दूतावासाजवळ पाच रॉकेट डागल्याची माहिती समोर आली होती. तसेच इराणने हा हल्ला केल्याचं म्हटलं जात होतं. सुलेमानींच्या हत्येनंतरही इराणने अशीच कारवाई केली होती. इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता. अमेरिकेने या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नसल्याचं म्हटलं होतं, मात्र त्यानंतर 34 सैनिक जखमी झाल्याचं मान्य केलं होतं. इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ दोन रॉकेट डागण्यात आले होते. यात कोणी जखमी झालं नव्हतं, पण इराण आणि अमेरिकेत तणाव वाढला होता. इराणी सैन्याने काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या इराकमधील बलाद येथे असलेल्या तळांवर रॉकेट हल्ला केला होता. इराणकडून अमेरिकेच्या या तळावर एकूण 8 रॉकेट डागण्यात आली. यामध्ये चार जण जखमी झाले होते. जखमींमध्ये दोन एअरमॅन आणि दोन इराकी अधिकाऱ्यांचा समावेश होता. या हल्ल्याची कुठलाही गट किंवा संघटनेने जबाबदारी घेतलेली नव्हती. मात्र हा हल्ला इराकमधील इराणचा पाठिंबा असलेल्या गटाने केल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला होता. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराण