डोनाल्ड ट्रम्प-हिलरी वाक्युद्ध विकोपाला

By Admin | Updated: October 12, 2016 05:48 IST2016-10-12T05:48:54+5:302016-10-12T05:48:54+5:30

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्यातील वाक्युद्ध विकोपाला गेले

Donald Trump-Hillary Wiki Wikopala | डोनाल्ड ट्रम्प-हिलरी वाक्युद्ध विकोपाला

डोनाल्ड ट्रम्प-हिलरी वाक्युद्ध विकोपाला

वॉशिंग्टन/न्यूयॉर्क : अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्यातील वाक्युद्ध विकोपाला गेले. ट्रम्प यांनी हिलरी यांचे पती बिल क्लिंटन यांचे चारित्र्यहनन करणारे आरोप केल्यामुळे प्रचाराने खालची पातळी गाठली. क्लिंटन हे महिलांच्या मागे वासूगिरी करीत फिरणारे व त्यांची लैंगिक पिळवणूक करणारे नीच व्यक्ती आहेत, असे ट्रम्प म्हणाले.

Web Title: Donald Trump-Hillary Wiki Wikopala