शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या स्वभावामागे एस्पिरिनचा ओव्हरडोस? अतिवापरामुळे विचित्र वागत असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:55 IST

Donald Trump Health & Aspirin Overdose: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एस्पिरिन औषधाचा ओव्हरडोज घेत आहेत. याचा त्यांच्या स्वभावावर आणि जागतिक निर्णयांवर काय परिणाम होत आहे? वाचा सविस्तर विश्लेषण.

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे लहरी वागणे, जागतिक नेत्यांची थट्टा उडवणे आणि वारंवार भूमिका बदलणे यामागे केवळ त्यांचा स्वभाव नसून, ते घेत असलेल्या औषधांचा 'ओव्हरडोज' कारणीभूत असल्याची धक्कादायक शक्यता समोर आली आहे. गेल्या दोन दशकांपासून ट्रम्प हे रक्त पातळ करण्यासाठी 'एस्पिरिन' या औषधाचे प्रमाणाबाहेर सेवन करत आहेत. त्याचे दुष्परिणाम आता त्यांच्या वागणुकीतून दिसत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

'न्यू यॉर्क टाइम्स'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, ७९ वर्षीय ट्रम्प यांना त्यांच्या वैद्यकीय पथकाने एस्पिरिनचा डोस कमी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ट्रम्प यांनी हा सल्ला धुडकावून लावला आहे. सामान्यतः गरज असलेल्या डोसपेक्षा ते सुमारे ४ पट जास्त (३२५ मिलीग्राम) औषध रोज घेतात. यावर त्यांनी "मला माझ्या हृदयात जाड रक्त नको आहे," अशी भूमिका त्यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत मांडली होती.

ट्रम्प यांना नसांतून रक्त हृदयाकडे पोहोचण्यास अडथळा येणे हा आजार आहे. त्यांच्या हातावर रक्ताचे साचल्याचे देखील दिसले होते. एस्पिरिन रक्त पातळ करते, परंतु ७० वर्षांवरील व्यक्तींमध्ये याचे रोजचे सेवन अंतर्गत रक्तस्त्राव किंवा ब्रेन हॅमरेजचा धोका वाढवते.

तज्ज्ञांचे धक्कादायक निरीक्षणएस्पिरिनचा ओव्हरडोज केवळ शरीरावरच नाही, तर मेंदूवरही परिणाम करतो. संशोधनानुसार, या औषधाच्या अतिसेवनामुळे मोठे मानसिक बदल दिसू शकतात. यामध्ये चिडचिडेपणा आणि गोंधळ सतत अस्वस्थ वाटणे आणि निर्णयांमध्ये गोंधळ होणे. मानसिक आरोग्य खालावणे आणि विनाकारण नैराश्य येणे. संवाद साधताना विचित्र चेहरे करणे किंवा लक्ष विचलित होणे.

जागतिक चिंतेचा विषयएका महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षाचे मानसिक आरोग्य आणि त्यांचे वर्तन हा केवळ वैयक्तिक प्रश्न उरलेला नाही. ट्रम्प यांच्या लहरी निर्णयांचा परिणाम जागतिक अर्थकारण आणि राजकारणावर होत आहे. एस्पिरिनच्या प्रभावामुळे जर त्यांचे मानसिक संतुलन ढळत असेल, तर हे संपूर्ण जगासाठी धोक्याचे असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's erratic behavior linked to aspirin overdose, sparking concerns.

Web Summary : Donald Trump's erratic behavior may stem from excessive aspirin use, causing mental changes like irritability and confusion. Experts suggest his high dosage, against medical advice, could impact global politics due to his potentially impaired decision-making.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका