शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द होणार! पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यांना ट्रम्प सरकारचा मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:50 IST

Donald Trump, Palestine Supporter students : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आल्यापासून नवनवे आणि कठोर निर्णय घेतले जात आहेत.

Donald Trump, Palestine Supporter students : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आल्यापासून नवनवे निर्णय घेतले जात आहेत. आता ट्रम्प सरकारने पॅलेस्टाईनचे समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दणका द्यायचे ठरवले आहे. ट्रम्प सरकार मोठी कारवाई करण्याच्या विचारात असून अमेरिकेतील सर्व 'पॅलेस्टाईन-हमास समर्थक' विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करणार आहे. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्यू लोकांविरोधातील भावनेचा सामना करण्यासाठी बुधवारी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करतील. या माध्यमातून पॅलेस्टाईनचे समर्थने करत निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या स्थलांतरित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि इतर परदेशी लोकांना हद्दपार करण्यास सुरुवात केली जाणार आहे.

ट्रम्प यांनी एका प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले की, जिहादी समर्थक निदर्शनास उपस्थित राहिलेल्या सर्व निवासी परदेशी लोकांना, आम्ही नोटीस दिली आहे. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि आम्ही तुम्हाला अमेरिकेतून हद्दपार करू. ट्रम्प पुढे असेही म्हणाले की, हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धादरम्यान अमेरिकेत निदर्शने झाली होती. संस्थांच्या कट्टरतावादामुळे प्रभावित झालेल्या कॉलेज कॅम्पस मधील सर्व हमास समर्थक विद्यार्थ्यांचे व्हिसा मी तात्काळ रद्द करणार आहे.

हमासचे हल्ले आणि त्यानंतर गाझावरील इस्रायली हल्ल्यांमुळे युनायटेड स्टेट्समध्ये अनेक महिने पॅलेस्टाईन समर्थक निदर्शने करत होते. त्याचा परिणाम अमेरिकन कॉलेज कॅम्पसमध्येही दिसून आला होता. विद्यार्थ्यांनी इस्रायल आणि ज्यू लोकांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली होती आणि ज्यू विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या. त्या सर्व गोष्टींची माहिती घेत आता ट्रम्प सरकारने कठोर निर्णय घेण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धPalestineपॅलेस्टाइनStudentविद्यार्थीVisaव्हिसा