Donald Trump G20 : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे 22-23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या G-20 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहभागी होणार नसल्याचे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले आहे. अमेरिका या परिषदेत फक्त शेवटच्या दिवशी होणाऱ्या औपचारिक अध्यक्षता हस्तांतरण सोहळ्यात प्रतिनिधी पाठवणार आहे. यावर्षी परिषदेनंतर G-20 ची अध्यक्षता अमेरिकेकडे जाणार आहे.
राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यांमुळे नाराजी वाढली
व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या अलिकडील टिप्पणीमुळे अमेरिकन प्रशासन नाराज झाले आहे. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेतील अधिकृत G-20 चर्चेत अमेरिका सहभागी होणार नाही. राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविषयी वापरलेली भाषा आम्हाला मान्य नाही.
रामाफोसा काय म्हणाले होते?
रामाफोसा यांनी अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले होते की, बॉयकॉटच्या राजकारणाचा उपयोगी नाही. G-20 च्या तंबूमध्ये राहणे हे बाहेर उभे राहण्यापेक्षा नेहमीच चांगले.
अमेरिका सहभागी होणार नाही, ट्रम्प यांची घोषणा
याच महिन्यात ट्रम्प यांनी जाहीर केले होते की, अमेरिकेचा कोणताही अधिकारी G-20 परिषदेत उपस्थित राहणार नाही. त्यांनी या बहिष्काराचे कारण दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या अल्पसंख्याक शेतकऱ्यांवर कथित हिंसा असे सांगितले होते.
ट्रम्पचे दावे आधारहीन, दक्षिण आफ्रिकेचा पलटवार
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने ट्रम्प यांच्या आरोपांना पूर्णपणे नाकारले. रामाफोसा म्हणाले की, अमेरिकेचा हा बहिष्कार म्हणजे परिषदेनंतर अमेरिकेकडे अध्यक्षता ‘रिकामी खुर्ची’ म्हणून सुपूर्द करण्यासारखे आहे. या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमध्ये परिषद सुरू होण्यापूर्वीच तणाव वाढला आहे.
Web Summary : Donald Trump will not attend the G-20 summit in South Africa, says White House. Trump is unhappy with South Africa's President Ramaphosa's remarks. The US will only attend the formal handover of the G-20 presidency.
Web Summary : डोनाल्ड ट्रम्प दक्षिण अफ्रीका में जी-20 शिखर सम्मेलन में भाग नहीं लेंगे। व्हाइट हाउस के अनुसार, ट्रम्प राष्ट्रपति रामाफोसा की टिप्पणियों से नाखुश हैं। अमेरिका केवल जी-20 अध्यक्षता के औपचारिक हस्तांतरण में भाग लेगा।