शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

डोनाल्ड ट्रम्प यांना दणका; फेसबुक, इन्स्टाग्राम खातं अनिश्चित काळासाठी बंद

By कुणाल गवाणकर | Updated: January 7, 2021 23:35 IST

चिथावणीखोर विधान ट्रम्प यांना भोवलं; अध्यक्षपदावरून पायउतार होईपर्यंत फेसबुक, इन्स्टाग्राम बंद

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम खातं अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं आहे. ट्रम्प अध्यक्ष पदावरून पायउतार होईपर्यंत त्यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट बंद राहील. त्यामुळे ट्रम्प पुढील दोन आठवडे फेसबुक, इन्स्टाग्रामवर काहीही पोस्ट करू शकणार नाहीत. दोन आठवड्यांत ट्रम्प यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपेल. त्यानंतर ज्यो बायडन अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली. यानंतरच ट्रम्प यांची फेसबुक आणि इन्स्टाग्राम खाती सुरू होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; इराकच्या कोर्टाकडून अटक वॉरंट जारीडोनाल्ड ट्रम्प यांना पोस्ट करण्याची परवानगी देणं अतिशय धोकादायक असल्याचं फेसबुकचे प्रमुख मार्क झकरबर्ग यांनी म्हटलं. ट्रम्प हिंसा भडकावू शकतात. त्यामुळेच आम्ही त्यांची पोस्ट हटवल्याची माहिती त्यांनी दिली. ट्रम्प यांनी फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत अमेरिकेच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या दंगलखोरांना घरी जाण्याचं आवाहन करण्यापूर्वी 'आय लव्ह यू' म्हटलं होतं. अखेर ट्रम्प यांनी स्वीकारला पराभव; बायडेन यांच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसचं शिक्कामोर्तबट्विटरनंदेखील ट्रम्प यांचं खातं १२ तासांसाठी बंद केलं असून त्यांची तीन ट्विट्सदेखील ब्लॉक केली आहेत. यामध्ये संसदेवर हल्ला करणाऱ्या समर्थकांशी साधलेल्या व्हिडीओचादेखील समावेश आहे. 'आज घडलेली घटना अभूतपूर्व आहे. वॉशिंग्टनमध्ये भडकलेला हिंसाचार पाहता आम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केलेले तीन ट्विट्स हटवणं गरजेचं वाटतं. या ट्विट्समुळे आमच्या नागरिक एकता धोरणाचं उल्लंघन झालं आहे,' असं ट्विटरच्या सुरक्षा विभागानं म्हटलं आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पFacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्रामTwitterट्विटर