शहरं
Join us  
Trending Stories
1
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
2
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
3
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
4
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
5
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
6
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
7
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
8
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
9
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
10
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
11
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
12
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
13
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
14
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
15
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
16
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
17
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
18
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
19
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
20
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर

नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 06:11 IST

नोबेल समितीने मात्र, ट्रम्प यांच्याविषयी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. आम्ही राजकीय दबाव किंवा अन्य दडपणाखाली निर्णय घेत नाही, असे नोबेल समितीने म्हटले आहे. 

ऑस्लो : दक्षिण अमेरिकेतील लोकशाही चळवळीला बळ देणाऱ्या व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना शांततेसाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. परंतु, हा पुरस्कार आपल्यालाच मिळावा यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अक्षरशः  तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आपण तब्बल सात युद्धे थांबवली असल्याच्या बढाया  मारत ट्रम्प यांनी नोबेलसाठी आपणच योग्य असल्याचे वारंवार म्हटले होते. या पुरस्कारासाठी मी पात्र असलो तरी नोबेल समिती कुठलेही भरीव कार्य नसलेल्यालाच हा पुरस्कार देईल, असे सांगत ट्रम्प यांनी त्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे उदाहरण देत टीकाही केली होती.  

नोबेल समितीने मात्र, ट्रम्प यांच्याविषयी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. आम्ही राजकीय दबाव किंवा अन्य दडपणाखाली निर्णय घेत नाही, असे नोबेल समितीने म्हटले आहे. 

ट्रम्प अन् व्हेनेझुएलाच्या नागरिकांना पुरस्कार अर्पण  

वॉशिंग्टन : आपल्याला मिळालेला पुरस्कार व्हेनेझुएलाचे नागरिक आणि या लढ्याला निर्णायक पाठिंबा देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अर्पण करत असल्याची भावना मचाडो यांनी व्यक्त केली आहे. व्हेनेझुएलातील विखुरलेल्या विरोधी पक्षांना मचाडो यांनी एकत्र आणून लोकशाहीला बळकटी दिली. त्यांना २०२४च्या निवडणुकांत भाग घेण्यास मनाई केली होती. तरीही त्यांचा न्याय्य व शांततापूर्ण संघर्ष सुरू होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump fumes after Nobel snub; Machado wins Peace Prize.

Web Summary : Maria Corina Machado won the Nobel Peace Prize for supporting Venezuelan democracy. Trump, who believed he deserved it for brokering peace, expressed anger. Machado dedicated the award to Venezuelans and Trump for their support.
टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प