काराकास : अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचा आरोप असलेल्या व्हेनेझुएलावर अमेरिकेने शनिवारी पहाटे लष्करी कारवाई करून तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नी सिलिया अडेला यांना पकडल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मादुरो व पत्नीला व्हेनेझुएलाबाहेर अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे. त्या देशाची राजधानी काराकासवर अमेरिकेने हवाई हल्ले केले.
अमेेरिकेने केलेल्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांनी जाहीर केले व आणीबाणी लागू केली. पण, त्यानंतर अवघ्या एका तासाच्या आतच त्यांना व पत्नीला अमेरिकी सैनिकांनी पकडले. अमेरिका व व्हेनेझुएला यांच्यात गेल्या चार महिन्यांपासून तणाव सुरू आहे. त्या देशाच्या आसपास अमेरिकेने युद्धनौका, सैनिकांच्या पलटणी व विमाने तैनात केली. अमेरिकी लष्कराने व्हेनेझुएलाच्या ३५ नौकांवर हल्ले केले आहेत. त्यात १००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
व्हेनेझुएलाच्या निर्वासितांना कोलंबिया आश्रय देणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक असलेले कोलंबिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सांगितले की, व्हेनेझुएलावर हल्ला झाल्यानंतर कोलंबिया सरकारने शनिवारी पहाटे राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्यासाठी एक बैठक घेतली. व्हेनेझुएलातून मोठ्या प्रमाणावर निर्वासित आल्यास त्यांना आश्रय देण्याच्या दृष्टीने काय तयारी करावी लागेल याची चाचपणी बैठकीत करण्यात आली.
हल्ल्याची कारणे काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आरोप केला की व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अन्यायकारक धोरणांमुळे त्या देशातील लाखो रहिवासी अमेरिकेत आले आहेत. मादुरो यांनी व्हेनेझुएलाच्या तुरुंगातील गुन्हेगार, रुग्णालयांतील लोकांना जाणीवपूर्वक अमेरिकेत जाण्यास भाग पाडले असा अमेरिकेचा दावा आहे.
अमेरिकेची नजर व्हेनेझुएलाच्या तेलावरही आहे. व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था पूर्णपणे तेलावर अवलंबून आहे. हा देश दररोज सुमारे नऊ लाख बॅरल तेल निर्यात करतो. चीन हा व्हेनेझुएलाचा सर्वांत मोठा तेल खरेदीदार आहे. व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वांत मोठा तेलसाठा असल्याचे मानले जाते.
डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे की, व्हेनेझुएलामार्गे हा अमेरिकेत कोकेन आणि फेंटानिलसारख्या धोकादायक अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते.
Web Summary : US allegedly captured Venezuela's President Maduro and his wife in a military operation, accusing him of drug trafficking. Venezuela announced an emergency, but Maduro was captured shortly after. Tensions had been rising for months, with the US deploying forces nearby. The US alleges Maduro's policies forced residents to migrate and accuses him of drug trafficking.
Web Summary : अमेरिका ने वेनेजुएला के राष्ट्रपति मादुरो और उनकी पत्नी को नशीली दवाओं की तस्करी के आरोप में सैन्य अभियान में पकड़ने का दावा किया। वेनेजुएला ने आपातकाल की घोषणा की, लेकिन मादुरो को जल्द ही पकड़ लिया गया। अमेरिका ने बल तैनात किए थे। अमेरिका का आरोप है कि मादुरो की नीतियों से निवासी प्रवास करने को मजबूर हुए।