शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला झटका, ब्रिटनमधील 4 हजार कोटींची संपत्ती जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 10:22 IST

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मोठा झटका मिळाला आहे. डॉन दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली, दि. 13 - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मोठा झटका मिळाला आहे. डॉन दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 6.7 बिलियन डॉलरची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार दाऊद इब्राहिमच्या तब्बल 4 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे. 

ब्रिटनमध्ये दाऊद इब्राहिमचे हॉटेल आणि कित्येक घरं आहेत, ज्यांची किंमत हजारो कोटी रुपयांच्या घरात आहे. गेल्या महिन्यातच ब्रिटन सरकारनं आर्थिक निर्बंधसंबंधीच्या यादीमध्ये दाऊदच्या नावाचा समावेश केला होता. यासंदर्भात भारतानं ब्रिटनला पूर्वीच अहवालदेखील सुपूर्द केला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात यूकेकडून मालमत्ता गोठवण्यासंदर्भातील जारी करण्यात आलेल्या यादीत दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानातील 3 ठिकाणांचाही उल्लेख करण्यात आला होता. ब्रिटनच्या अर्थमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या 'Financial Section Targets in the UK' या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानातील 3 ठिकाणांच्या पत्त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. 

ब्रिटननं जारी केलेल्या यादीनुसार, कासकर दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानातील ठिकाणांचे पत्ते, 1)  हाऊस नं. 37, मार्ग क्रमांक 30, डिफेंस हाऊसिंग अथॉरिटी, कराची, पाकिस्तान. 2)नूराबाद, कराची, पाकिस्तान आणि 3) व्हाइट हाऊस सौदी मस्जिदजवळ, क्लिफ्टन, कराची या पत्त्यांचा समावेश आहे.  फोर्ब्स मॅगझिननुसार जगातील मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर एवढी आहे. दाऊद इब्राहिम हा जगातील क्रमांक दोनचा सर्वाधिक श्रीमंत असा डॉन असल्याचे मानले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, 1993 मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिमची ब्रिटनमध्ये 4 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा