या कॅफेत रात्री झोपतात कुत्रे

By Admin | Updated: April 16, 2017 00:58 IST2017-04-16T00:58:05+5:302017-04-16T00:58:05+5:30

कॅफेमध्ये कुत्रे झोपलेले कधी तुम्ही ऐकलं आहे का? नाही ना. पण, हे छायाचित्र पाहिल्यावर तुमचा विश्वास बसू शकतो. हे आहे ग्रिसमधील एक कॅफे. दिवसभर या कॅफेत

Dogs sleeping in the night in this cafe | या कॅफेत रात्री झोपतात कुत्रे

या कॅफेत रात्री झोपतात कुत्रे

अथेन्स : कॅफेमध्ये कुत्रे झोपलेले कधी तुम्ही ऐकलं आहे का? नाही ना. पण, हे छायाचित्र पाहिल्यावर तुमचा विश्वास बसू शकतो. हे आहे ग्रिसमधील एक कॅफे. दिवसभर या कॅफेत ग्राहकांची वर्दळ असते. या कॅफे मालकाला असे वाटले की, रात्री ही जागा रिकामीच असते. मग येथे कुत्रे झोपले तर काय फरक पडतो. त्यामुळे भटक्या कुत्र्यांसाठी त्यांनी ही जागा रात्री खुली ठेवली. पाहता पाहता येथे कुत्रे रात्री झोपण्यासाठी येऊ लागले. अर्थात, कुत्र्यांच्या कॅफेतील आश्रयावर काही ग्राहकांनी आक्षेप घेतला आहे. पण, मालकाचे असे म्हणणे आहे की, आम्ही सकाळी ही जागा स्वच्छ करुन घेतो. बाकी काहीही असो. पण, या कुत्र्यांच्या नशिबात सद्या मऊ गाद्यांवरची झोप आहे.

Web Title: Dogs sleeping in the night in this cafe