समर्थाघरचे श्वान... व्हाईट हाऊसमध्ये बायडन यांच्या कुत्र्याची दहशत, २४ जणांचा घेतला चावा  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 08:52 AM2024-02-23T08:52:41+5:302024-02-23T08:57:44+5:30

White House: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेमध्ये तैनात सिक्रेट सर्व्हिस एजंट मोठ्या अडचणीत सापडले आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत तैनात असलेले हे सिक्रेट सर्व्हिस एजंट एका कुत्र्यापासून आपलं संरक्षण करण्यात अपयशी ठरत आहेत.

Dogs of Samarthaghar... Joe Biden's dog terrorized in the white hour, 24 people were bitten | समर्थाघरचे श्वान... व्हाईट हाऊसमध्ये बायडन यांच्या कुत्र्याची दहशत, २४ जणांचा घेतला चावा  

समर्थाघरचे श्वान... व्हाईट हाऊसमध्ये बायडन यांच्या कुत्र्याची दहशत, २४ जणांचा घेतला चावा  

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेमध्ये तैनात सिक्रेट सर्व्हिस एजंट मोठ्या अडचणीत सापडले आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत तैनात असलेले हे सिक्रेट सर्व्हिस एजंट एका कुत्र्यापासून आपलं संरक्षण करण्यात अपयशी ठरत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा पाळीव कुत्रा कमांडर याने अमेरिकी सिक्रेट सर्व्हिस एजंटांच्या नाकी नऊ आणले आहेत. तसेच आतापर्यंत जवळपास २४ जणांचा या श्वानाने चावा घेतला आहे. 

एका वृत्तानुसार सिक्रेट सर्व्हिस रेकॉर्डमधून समोर आलं की, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या जर्मन शेफर्प यांचा पाळीव श्वार असलेल्या कमांडर याने सुरक्षा रक्षकांमध्ये खळबळ उडवली आहे. ही माहिती  माहितीच्या अधिकारामधून मागवलेल्या माहितीमधून समोर आली आहे. मात्र आता या कमांडरला व्हाईट हाऊसमधून हटवण्यात आलं आहे. या श्वानाने ऑक्टोबर २०२२ आणि जुलै २०२३ दरम्यान, कुत्र्याने जवळपास २४ जणांचा चावा घेतला आहे. या कागदपत्रांमध्ये केवळ सिक्रेट सर्व्हिस एजंटचा समावेश आहे. तसेच यात व्हाईट हाऊस आणि कॅम्प डेव्हिडच्या कर्मचाऱ्यांचा समावेश नाही आहे. अशा परिस्थितीत या कुत्र्याने इतर व्यक्तींच्या घेतलेल्या चाव्याच समावेश नाही आहे. एका सिक्रेट सर्व्हिस एजंटला चावा घेऊन गंभीर जखमी केल्यानंतर या कुत्र्याला गंभीररीत्या जखमी केले आहे. 

जून महिन्यामध्येही या कुत्र्याने एका एजंटवर हल्ला केला होता. तसेच त्याचा चावा घेऊन त्याला गंभीर जखमी केले होते. काही कागदपत्रांनुसार व्हाइट हाऊसच्या एका भागात फरशीवर पडलेल्या रक्तामुळे इमारतीचा पूर्व भाग २० मिनिटांसाठी बंद करण्यात आला होता. जुलै महिन्यात या कुत्र्याने एका अन्य एजंटला चावा घेऊन जखमी केले होते. त्यानंतर त्याला सहा टाके घालावे लागले होते. २०२१ मध्ये जो बायडन यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर कमांडरला व्हाइट हाऊसमध्ये आणण्यात आले होते.  

Web Title: Dogs of Samarthaghar... Joe Biden's dog terrorized in the white hour, 24 people were bitten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.