शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! डाव्या पायाच्या उपचारासाठी गेला होता रूग्ण, डॉक्टरने चुकून उजवा पाय कापला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 11:52 IST

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना आहे ऑस्ट्रियातील. इथे डॉक्टरने एका रूग्णाच्या चुकीच्या पायाचं ऑपरेशन करून पाय कापला.

आपण हे नेहमीच ऐकत असतो की, डॉक्टर हे देवाचं रूप असतात. पण अनेकदा असंही बघायला मिळतं की त्यांच्याकडूनही चुका होतात. काही डॉक्टर तर इतके बेजबाबदार असतात की, त्यांच्या चुकीची शिक्षा रूग्णांना भोवागी लागते. अशीच एक घटना समोर आली आहे. एक रूग्ण डाव्या पायाच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता. पण डॉक्टरने त्या रूग्णाचा चुकून उजवा पाय कापला. 

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना आहे ऑस्ट्रियातील. इथे डॉक्टरने एका रूग्णाच्या चुकीच्या पायाचं ऑपरेशन करून पाय कापला. दुसऱ्या दिवशी नर्स रूग्णाच्या पायाचं ड्रेसिंग करत होती तेव्हा या प्रकाराचा खुलासा झाला. ऑस्ट्रियाच्या फ्रीस्टेंड क्लीनिकमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरने चुकून रूग्णाच्या दुसऱ्या पायाची सर्जरी केली. रूग्णाच्या डाव्या पायात वेदना होत होत्या म्हणून हॉस्पिटलमध्ये आला होता.

जेव्हा नर्सला या चुकीबाबत लक्षात आलं  तेव्हा तिने लगेच हायर अथॉरिटीला याची माहिती दिली. पूर्ण  घटना जेव्हा समोर आली तेव्हा हॉस्पिटलने आपली चूक मान्य केली. हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं की, ज्या व्यक्तीचा पाय कापला गेला त्यांचं वय ८२ वर्षे आहे. या चुकीमुळे झालेल्या नुकसानाची जबाबदारी हॉस्पिटल घेणार आहे.

डॉक्टरच्या एका चुकीची शिक्षा वयोवृद्ध रूग्णाला भोगावी लागत आहे. कारण त्याची पायाची समस्या दूर झालेली नाही. ती तशीच आहे. आता त्यांचा दुसरा पाय सुद्धा गुडघ्या खालून कापावा लागणार  आहे. 

अनेकांना प्रश्न पडला असेल की, डॉक्टर इतकी मोठी चूक कशी करू शकतात. याची चौकशी सुरू आहे. असे सांगितलं जात आहे की, ऑपरेशन थिएटरमद्ये घेऊन जाण्याआधी रूग्णाच्या चुकीच्या पायावर निशाण करण्यात आलं होतं. ज्यामुळे डॉक्टरने निशाण असलेल्या पायाचं ऑपरेशन केलं. आता या रूग्णाला दोन्ही पायांविना आयुष्य जगावं लागेल. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य