शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

रुग्णापासून डॉक्टरांना झाला कॅन्सर, शस्त्रक्रियेदरम्यानची छोटीशी चूक ठरली महागात, त्यानंतर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:18 IST

Health News: सर्वसाधारणपणे कॅन्सर हा संसर्गजन्य आजार मानला जात नाही. मात्र जर्मनीमध्ये घडलेल्या घटनेमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

कॅन्सर या जीवघेण्या आजाराचं नाव ऐकलं तरी अनेकांच्या तोंडचं पाणी पळतं.  वैद्यकशास्त्रात खूप मोठी मजल मारल्यानंतरही कर्करोगावर अद्याप खात्रीशीर इलाज सापडलेला नाही. वेळीच सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास कॅन्सरवर उपचार करता येतात. मात्र अखेरच्या टप्प्यात निदान झाल्यास तो एक गंभीर आजार बनतो. कॅन्सर हा संसर्गजन्य आजार मानला जात नाही. मात्र जर्मनीमध्ये घडलेल्या घटनेमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

जर्मनीमध्ये एका डॉक्टरांना त्यांच्याकडेच उपचार घेत असलेल्या रुग्णाकडून कॅन्सरची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब उघडल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. त्याचं कारण म्हणजे आतापर्यंत कॅन्सरला संसर्गजन्य आजार मानलं जात नव्हतं. एका रुग्णावर शस्त्रक्रिया करून ट्युमर काढत असताना या डॉक्टरांना कॅन्सरचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झालं आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ३२ वर्षांच्या व्यक्तीला एक दुर्मीळ प्रकारचा कर्करोग झाला होता. शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटामधून ट्युमर काढण्यात येत होता. त्यादरम्यान, एका ५३ वर्षीय डॉक्टरांच्या बोटाला छोटीशी जखम झाली होती. मात्र त्यांनी शस्त्रक्रिया सुरू ठेवली. हीच चूक या डॉक्टरांना महागात पडली. त्यानंतर या डॉक्टरांनी जखमेला डिसइन्फेक्ट करून त्वरित बँडेज बांधले, तसेच ते निश्चिंत झाले. मात्र या शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यांनी या डॉक्टरांना त्यांच्या बोटावर एक गाठ आल्याचे निदर्शनास आले. तसेच ती कर्करोगाची गाठ असल्याचे तपासणीतून समोर आलं.

याबाबत अधिक माहिती मिळताना तज्ज्ञांना सदर शस्त्रक्रिया करत असलेल्या डॉक्टरांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याचा दिसून आले. त्यामुळे कॅन्सरची पेशी त्यांच्या शरीरात प्रवेश करण्यात यशस्वी ठरली. तसेच सदर डॉक्टरांना रुग्णापासून एक दुर्मीळ प्रकारचा कर्करोग झाला होता, असेही तपासातून दिसून आले.

मात्र नंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बोटावरील गाठ हटवली. त्यानंतर त्यांना पुन्हा कर्करोग झाला नाही. दुसरीकडे पहिल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केलेला तो रुग्ण मात्र मृत्युमुखी पडल्याचं दिसून आलं. या घटनेमुळे कर्करोग हा संसर्गन्य नसल्याचा आतापर्यंतचा समज खोडून काढला आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्राची चिंता वाढवली आहे.  

टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोगGermanyजर्मनीInternationalआंतरराष्ट्रीयdocterडॉक्टर