शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

३० वर्षांत डॉक्टरचे ३०० मुलांवर अत्याचार! तणाव सहन न झाल्याने दोन मुलांनी संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 07:10 IST

लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या बाबतीत फ्रान्समधली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घटना आहे

फ्रान्स आणि जगभरात सध्या एका डॉक्टरची कहाणी चर्चेत आहे. डॉक्टर तसा प्रसिद्ध, गॅस्ट्रिक सर्जन, पण त्याचे कुकर्मही तितकेच माेठे. जोएल ले स्कॉरनेक हे त्याचं नाव. फ्रान्सच्या न्यायालयानं नुकतीच त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावली. काय करावं या डॉक्टरनं? त्यानं तब्बल ३०० मुलांचं लैंगिक शोषण केलं. त्यात त्यानं त्याच्या भाचीलाही सोडलं नाही. तणाव सहन न झाल्यानं ही केस सुरू असताना यातल्या दोन पीडित मुलांनी आत्महत्याही केली.

लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या बाबतीत फ्रान्समधली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घटना आहे. दोषी डॉक्टर जोएल स्कॉरनेक सध्या ७४ वर्षांचा आहे. १९८९ ते २०१४ या काळात फ्रान्सच्या वेगवेगळ्या नऊ हॉस्पिटल्समध्ये आणि क्लिनिक्समध्ये तो काम करीत होता. याच काळात त्यानं हॉस्पिटलमध्ये आलेल्या लहान मुलांचं लैंगिक शोषण केलं. मुख्य म्हणजे ही मुलं कुठल्या ना कुठल्या आजारानं त्रस्त होती. बऱ्याच जणांचं ऑपरेशन करायचं होतं. त्यामुळे त्यांना गुंगीचं आणि बेशुद्धीचं औषध देण्यात आलं. या मुलांना कुठलंही भान नसताना या कुकर्मी डॉक्टरनं त्यांच्यावर अत्याचार केले. बेशुद्धीत असताना त्यांच्यावर हे अत्याचार झाल्यानं आपल्या बाबतीत नेमकं काय झालं, हेही यातल्या बऱ्याच मुलांना माहीत नाही. 

लहान मुलांच्या अत्याचाराचं हे प्रकरण बाहेर येताच संपूर्ण फ्रान्समध्ये संतापाचा उद्रेक झाला. त्याच्या अटकेसाठी आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी लोकांनी धरणं, आंदोलनं केली. मोर्चे काढले. आरोपी डॉक्टरनं सर्वांत आधी म्हणजे १९८५मध्ये आपल्या पाच वर्षांच्या भाचीवर बलात्कार केला होता. दुसऱ्या भाचीवरही त्यानं लैंगिक अत्याचार केले. बऱ्याच वर्षांनंतर म्हणजे २०१७मध्ये त्याच्या कृत्यांचा उलगडा झाला. त्यावेळी त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका सहा वर्षीय मुलीसमोर त्यानं अश्लील चाळे केले होते. मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर या डॉक्टरच्या घराची झडती घेण्यात आली. त्यानंतर खऱ्या अर्थानं या प्रकरणाला वाचा फुटली. त्याच्या घरात सेक्स टॉइजनी बॉक्सच्या बॉक्स भरलेले होते. संगणकात आणि तब्बल दोन डझन हार्ड ड्राइव्हमध्ये तसलाच मजकूर, फोटो, व्हिडीओ होते. एवढंच नव्हे, त्याच्याकडे शेकडो पानं भरलेली एक डायरीही मिळाली. त्यात त्यानं किती मुलांवर, केंव्हा लैंगिक अत्याचार केले, त्यांची नावं, पत्ते.. यासंबंधीचं विस्तृत विवरण लिहिलेलं होतं. 

एकूण चार मुलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्यावेळी त्याच्यावर खटला भरण्यात आला आणि त्याला १५ वर्षांची शिक्षा देण्यात आली. २०२०मध्ये त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. पण आणखीही असंख्य मुलांवर त्यानं लैंगिक अत्याचार केले होते. एक एक करीत त्याचे गुन्हे समोर येत गेले. त्यानं तीनशे मुलांवर लैंगिक गुन्हे केल्याचं आतापर्यंत सिद्ध झालं आहे. कदाचित हे गुन्हे आणखीही अधिक असू शकतील. त्यानंतर आरोपी डॉक्टर जोएल स्कॉरनेकवर नव्यानं खटला दाखल करण्यात आला. फेब्रुवारी २०२५पासून न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती. न्यायालयानं आता त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. गेल्या ३० वर्षांपासून त्यानं ज्या बालकांवर अत्याचार केले, त्यात १५८ मुले आणि १४१ मुली होत्या. त्यातले बरेच अल्पवयीन होते. 

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी