सध्या संपूर्ण जगाचे लक्ष 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' कडे लागले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा हा आता मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. इराणने हा सागरी मार्ग बंद करण्याची धमकी दिल्याने जागतिक व्यापारावर मोठे संकट ओढवले आहे. पण ज्या जागेवरून हे युद्ध सुरू आहे, त्या होर्मुझचा इतिहास काय आहे? तिथले मूळ लोक कोण होते?
'होर्मुझ' हे नाव प्रत्यक्षात इतिहासजमा झालेल्या एका प्राचीन द्वीपीय शहरावरून आले आहे. १० व्या ते १७ व्या शतकापर्यंत 'होर्मुझचे राज्य' हे समुद्री व्यापाराचे एक अत्यंत समृद्ध केंद्र होते. या राज्याचे नियंत्रण पर्शियन आखाताच्या दोन्ही बाजूंना म्हणजेच इराण आणि अरब क्षेत्रांवर होते.
कोण होते मूळ रहिवासी?होर्मुझच्या मूळ रहिवाशांचा शोध घेतल्यास तिथे मिश्र संस्कृती पाहायला मिळते. यात प्रामुख्याने स्थानिक फारसी (इराणी) लोक, अरब समुदाय आणि हिंद महासागरातील समुद्री व्यापाऱ्यांचा समावेश होता. 'होर्मुझ' या शब्दाची उत्पत्ती 'हुर-मोग' (खजुराची जागा) या फारसी शब्दावरून झाली असावी, असे मानले जाते.
पोर्तुगीजांचे आक्रमण आणि सत्तापालट१५१५ ते १६२२ या काळात होर्मुझवर पोर्तुगीजांचे राज्य होते. त्यांनीच सर्वात आधी येथे 'कार्टाज' नावाची सागरी कर प्रणाली सुरू केली होती. मात्र, १६२२ मध्ये फारसचा राजा शाह अब्बास प्रथम याने पोर्तुगीजांना हाकलून लावले आणि हा भाग पुन्हा इराणच्या (फारस) नियंत्रणात आला. सध्या हा भाग इराणच्या 'होर्मोजगान' प्रांताचा भाग आहे.
आजचे महत्त्व आणि युद्धआज हा मार्ग जगासाठी इतका महत्त्वाचा आहे कारण जगातील कच्च्या तेलाचा मोठा पुरवठा याच चिंचोळ्या मार्गातून होतो. इराणने हा मार्ग बंद करून तिथे टोल लावण्याची भाषा केल्यामुळे अमेरिकेने ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. ज्या मार्गावर एकेकाळी व्यापाऱ्यांची रेलचेल होती, तिथे आता युद्धाच्या नौका आणि क्षेपणास्त्रांचा थरार पाहायला मिळत आहे.
Web Summary : The Strait of Hormuz, now a US-Iran conflict flashpoint, was once a thriving trade center. Populated by Persians, Arabs, and Indian traders, it was later controlled by the Portuguese, who implemented tolls. Today, its oil passage is vital, fueling global tensions.
Web Summary : होर्मुज जलसंधि, जो अब अमेरिका-ईरान संघर्ष का केंद्र है, कभी एक समृद्ध व्यापार केंद्र था। यहाँ फारसी, अरब और भारतीय व्यापारी बसे थे। बाद में, इस पर पुर्तगालियों का नियंत्रण हो गया, जिन्होंने टोल लागू किया। आज, इसका तेल मार्ग महत्वपूर्ण है, जो वैश्विक तनाव को बढ़ा रहा है।