मला फसवलं तसं पाकिस्तानला नको फसवू - रेहाम खान

By Admin | Updated: October 31, 2016 14:28 IST2016-10-31T14:20:14+5:302016-10-31T14:28:57+5:30

इमरान खानचा तेहरकी-ए-इन्साफ पक्ष येत्या दोन नोव्हेंबरला इस्लामाबादमध्ये नवाझ शरीफ सरकार विरुद्ध मोठे आंदोलन छेडणार आहे.

Do not want Pakistan to cheat me - Rehman Khan | मला फसवलं तसं पाकिस्तानला नको फसवू - रेहाम खान

मला फसवलं तसं पाकिस्तानला नको फसवू - रेहाम खान

 ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. ३१ - इमरान खान माझ्यासोबत जे वागला त्याने माझ्याबरोबर जे केले तसे त्याने पाकिस्तान बरोबर करु नये अशी मी अपेक्षा करते. इमरानची पूर्वपत्नी रेहाम खानने हे विधान केले आहे. इमरान खानचा तेहरकी-ए-इन्साफ पक्ष येत्या दोन नोव्हेंबरला इस्लामाबादमध्ये नवाझ शरीफ सरकार विरुद्ध मोठे आंदोलन छेडणार आहे. 
 
त्या पार्श्वभूमीवर जिओ न्यूजने रेहामची प्रतिक्रिया जाणून घेतली. मागच्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात मी इमरानकडून लग्नाचा पहिला वाढदिवस असल्याने सुंदर गिफ्टची अपेक्षा करत होते पण त्याने मला घटस्फोटाची भेट दिली असे रहामने सांगितले. पाकिस्तान बरोबर तो असे वागणार नाही यासाठी आपण प्रार्थना करुया असे रेहाम म्हणाली. 
 
क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास करणा-या इमरान खानने ब्रिटीश टीव्ही निवेदीका रेहाम खानबरोबर दुसरा विवाह केला होता. पण त्यांचा विवाह फक्त १० महिनेच टिकला. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दोघे विभक्त झाले. मी खूप बोलकी आहे. मी सतत बोलत रहायची पण इमरान खानबरोबर तुम्ही घरच्या पडद्याचा रंग कुठला हवा अशा विषयांवर बोलू शकत नाही फक्त राजकारणावर त्याच्याशी चर्चा करत रहा. तो अजिबात रोमँटिक नाही. त्याने मला काही दिले नाही अशी खंत रेहामने मागच्यावर्षी द एक्सप्रेस ट्रिब्युन या वर्तमानपत्राल दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती. 
 

Web Title: Do not want Pakistan to cheat me - Rehman Khan