युद्धखोर प्रवृत्तीच्या राज्यक र्त्यांची इतिहास नोंद घेत नाही - राष्ट्रपती

By admin | Published: May 2, 2016 01:53 AM2016-05-02T01:53:16+5:302016-05-02T01:53:16+5:30

काळ््या शर्टातील मुसोलिनी, तपकिरी शर्टातील हिटलर आणि लाल शर्टातीले स्टॅलिन यापैकी कोणीही मानवतेवर विजय संपादन करू शकले नाहीत. दीर्घकाळ जगाच्या स्मरणात राहिले

Do not record the history of the warlords' rulers - the President | युद्धखोर प्रवृत्तीच्या राज्यक र्त्यांची इतिहास नोंद घेत नाही - राष्ट्रपती

युद्धखोर प्रवृत्तीच्या राज्यक र्त्यांची इतिहास नोंद घेत नाही - राष्ट्रपती

Next

- सुरेश भटेवरा (न्यूझीलंडमधून)

आॅकलंड : काळ््या शर्टातील मुसोलिनी, तपकिरी शर्टातील हिटलर आणि लाल शर्टातीले स्टॅलिन यापैकी कोणीही मानवतेवर विजय संपादन करू शकले नाहीत. दीर्घकाळ जगाच्या स्मरणात राहिले ते फक्त महात्मा गांधी, ज्यांनी सदराच घातला नाही. इतिहासापासून काही शिकायचे असेल तर सर्वांनी एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की युद्ध जिंकणारे आक्रमक विजेते अथवा दमनशाहीने कारभार करणारे शासनक र्ते, यापैकी कोणाचीही इतिहास नोंद घेत नाही. माणुसकीवर विश्वास असलेल्या सभ्य समाजाचे हेच तर खरे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी न्यूझीलंडमधील भारतीय नागरीकांच्या संमेलनात केले.
तीन दिवसांच्या दौऱ्यात न्यूझीलंडमध्ये स्थायिक भारतीय समुदायाशी मनमोकळा संवाद साधताना रविवारी सायंकाळी कोणाचेही नाव न घेता राष्ट्रपती सूचक शब्दांत बरेच काही सांगून गेले. टाळ््यांचा कडकडाट करीत ५00 पेक्षा अधिक निमंत्रितांनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिला. पूर्वेकडच्या या देशात आपल्या कर्तृत्वाने प्रगती साधणाऱ्या भारतीय समुदायाची मुक्त कंठाने प्रशंसा करीत राष्ट्रपतींनी भारत न्यूझीलंड दरम्यान वृध्दिंगत होत असलेल्या संबंधांवरही प्रकाशझोत टाकला. रविवारी दिवसभर लँघम हॉटेलच्या प्रशस्त सभागृहात, अनेक कार्यक्रमांची रेलचेल होती. सर्वप्रथम उभय देशांच्या प्रतिनिधींनी भारत न्यूझीलंड दरम्यान नियमित व थेट हवाई वाहतूक सुरू करण्यासाठी औपचारिक करारावर राष्ट्रपती आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या केल्या. पंतप्रधान जॉन की म्हणाले, लोकसंख्येच्या दृष्टीने भारत आणि चीन समान स्तरांवर असलेले देश आहेत, मात्र न्यूझीलंडचा चीनशी व्यापार जितक्या व्यापक प्रमाणात आहे, त्या तुलनेत भारत बराच मागे आहे. उभय देशात मुक्त व्यापार करार झाल्यास ही तफावत दूर होईल, अशी आशा आहे. राष्ट्रपती त्यावर म्हणाले, मुक्त व्यापारासंबंधी सुरू असलेल्या वाटाघाटींना लवकरच मूर्त स्वरूप प्राप्त होईल, अशी आशा करूया. लेबर पार्टीचे न्यूझीलंड संसदेतील विरोधी पक्षनेते अँड्र्यु लिटल यांनी राष्ट्रपतींची यानंतर भेट घेतली.
इंडिया न्यूझीलंड बिझिनेस कौन्सिल आयोजित उद्योग व्यापार क्षेत्रातल्या प्रतिनिधींच्या बैठकीला दुपारी राष्ट्रपतींनी संबोधित केले. व्यावसायिकांबरोबर भारतीय उद्योजकांनाही या देशात मोठी संधी आहे, असे नमूद करीत राष्ट्रपती म्हणाले, लोकशाही व्यवस्थेमुळे उभय देशात तणाव कधीच नव्हता. पूर्वीपासून चालत आलेले संबंध आता तर आणखी मजबूत होत आहेत, व्यापार क्षेत्रातल्या भारतीयांनी त्याचा उचित लाभ उठवला पाहिजे. उच्चशिक्षणासाठी भारतातले तरूण विद्यार्थी मोठया संख्येने न्यूझीलंडमध्ये दाखल होत आहेत. भविष्यकाळात हेच तरूण भारतीय संस्कृतीचे खरे राजदूत असतील. रविवारी सकाळी राष्ट्रपतींनी दोन्ही जागतिक युद्धात वीरमरण आलेल्या जवानांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन भारताच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले.
आॅकलंड तंत्रज्ञान विद्यापीठात विद्यार्थ्यांशी हितगुज हा राष्ट्रपतींच्या पाच दिवसांच्या दौऱ्याचा अखेरचा कार्यक्रम. भारताच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी या विद्यापीठाला सोमवारी सकाळी भेट दिली. १९८३ साली सुरू झालेल्या आॅकलंड विद्यापीठात सध्या ३0 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भारतीय विद्यार्थ्यांची संख्या त्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भविष्यात हेच विद्यार्थी उभय देशांना अधिक जवळ आणतील, यावर माझा विश्वास आहे. उच्चशिक्षण क्षेत्रात आॅकलंड विद्यापीठाने अल्पावधीत साऱ्या जगाकडून प्रशंसा मिळविल्याचा गौरव करीत राष्ट्रपती म्हणाले, शिक्षकी पेशातूनच मूलत: मी राजकारणात आलो. विद्यापीठांच्या गुणवत्तेत वाढ घडवण्यासाठी शिक्षकांनी संशोधन वृत्तीला अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे, असा माझा आग्रह आहे.

अ‍ॅक्ट इस्ट पॉलिसीचा प्रभाव
न्यूझीलंडला भेट देणारे प्रणव मुखर्जी हे भारताचे पहिलेच राष्ट्रपती. पंतप्रधान राजीव गांधींनी यापूर्वी १९८६ साली न्यूझीलंडमधे पाऊ ल ठेवले होते. त्याला तब्बल ३0 वर्षे झाली. या कालखंडात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश किती बदलले याचे पुरावे १५ लाख लोकवस्तीच्या आॅकलंड शहरात हिंडताना जागोजागी सापडतात.
अत्यंत आखीव रेखीव आणि पहाताक्षणी पे्रमात पडावे अशी घरे, उंच इमारती येथे आहेत. मात्र त्या फक्त वाणिज्यिक व्यवहारांपुरत्या. शहरात धूळ, कचरा घाणीचे साम्राज्य कुठेही नाही. वाहतुकीला करडी शिस्त. दारू पिऊ न वाहन चालवणे हा तर सर्वात गंभीर गुन्हा मानला जातो. सांस्कृतिकदृष्ट्या न्यूझीलंड मागासलेला देश नाही. भारताविषयी इथल्या जनतेला आकर्षण वाटते याचे आणखी एक कारण या देशातही लोकशाही व्यवस्था आहे. सध्या जॉन की यांच्या नॅशनल पार्टीची देशात सत्ता आहे. देशात कॉस्मॉपॉलिटन लोकवस्ती असली तरी ख्रिश्चनांची लोकसंख्या सर्वाधिक आहे.
न्यूझीलंडमधे भारतीय नागरीक अथवा ज्यांचे मूळ भारतीय आहे अशा १ लाख ७४ हजार लोकांचे वास्तव्य आहे. त्यातले जवळपास ८0 टक्के एकतर गुजराती अथवा पंजाबी आहेत. आॅकलंड असो की वेलिंग्टन बहुतांश किराणा व्यापारावर बहुतांश गुजराती व्यापाऱ्यांचेच साम्राज्य आहे. याखेरीज दुधदुभत्याचा व्यापार, डॉक्टर्स, चार्टर्ड अकौंटंटस, माहिती तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रातले अभियंते फॉर्मास्युटिकल व्यापार यात न्यूझीलंडमधे भारतीय आघाडीवर आहेत. देशात भारतीय नागरीक हा पाचवा मोठा जनसमूह आहे. भारतातले २३ हजार विद्यार्थी सध्या न्यूझीलंडमधे उच्च शिक्षण घेतात, कारण या देशात चांगल्या पदाची नोकरी हमखास मिळेल याची त्यांना खात्री वाटते. दिवसेंदिवस ही संख्या वाढतेच आहे.
क्रिकेट आणि सिनेमा या दोन क्षेत्रांनी उभय देशांना आणखी जवळ आणले. भारताइतकेच क्रिकेटप्रेम न्यूझीलंडमधेही आहे. याखेरीज बॉलिवूडसह विविध ु्रभारतीय भाषांमधील अनेक चित्रपटांच्या चित्रिकरणाचे न्यूझीलंड हे सध्याचे लोकप्रिय डेस्टिनेशन आहे. हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटात न्यूझीलंडचे वारंवार दर्शन घडत असल्याने भारतीय पर्यटकांची संख्या या देशात प्रतिवर्षी ४0 हजारांपर्यंत वाढली आहे. भारताइतकीच जोरात न्यूझीलंडमधे अलीकडे दिवाळी साजरी होते. देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमधे हिंदी चौथ्या क्रमांकावर आहे. ४0 लाख लोकसंख्या असलेल्या या देशाला भारताची अग्रक्रमाने दखल घ्यावीशी वाटते, याचे कारण भारत ही जगातील मोठी बाजारपेठ असल्याचे भान न्यूझीलंडला आहे. इतकेच नव्हे तर पॅसिफिक उपखंडापुरता नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही अनेक मुद्यांबाबत दोन्ही देशांची भूमिका समानच आहे.

Web Title: Do not record the history of the warlords' rulers - the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.