दक्षिण चीन समुद्रात तेल शोधू नका - चीनची भारताला तंबी
By Admin | Updated: May 31, 2015 15:17 IST2015-05-31T15:16:07+5:302015-05-31T15:17:57+5:30
आमच्या परवानगी शिवाय दक्षिण चीन समुद्रात तेल व गॅस ब्लॉकची शोधमोहीम राबवू नका अशी धमकीच चीनने भारताला दिली आहे.

दक्षिण चीन समुद्रात तेल शोधू नका - चीनची भारताला तंबी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनकडे मैत्रीचा हात पुढे केला असला तरी विविध मुद्द्यांवरुन भारताला तंबी देण्याचे चीनी उद्योग अजूनही सुरुच आहेत. आमच्या परवानगी शिवाय दक्षिण चीन समुद्रात तेल व गॅस ब्लॉकची शोधमोहीम राबवू नका अशी धमकीच चीनने भारताला दिली आहे.
भारत व व्हिएतनाममध्ये नुकतेच आर्थिक व संरक्षण क्षेत्रात सहकार्याचे करार झाले होते. यामध्ये तेल क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कराराचा समावेश आहे. यानुसार व्हिएतनामच्या सागरी भागात भारताची ओएनजीसी व व्हिएतनाम तेलासाठी शोध मोहीम राबवणार आहेत. चीनने यावर आक्षेप घेत भारताने दक्षिण चीन समुद्रात चीनची परवानगी घेतल्याशिवाय कोणतीही शोधमोहीम राबवू नये असे चीनच्या वरिष्ठ अधिका-याने म्हटले आहे. दक्षिण चीन समुद्रावर चीनने नेहमीच दावा ठोकला असून या समुद्रातील ८० टक्क्यांहून अधिक भाग हा आमचाच आहे असे चीनचे म्हणणे आहे.