चपात्या बनवायला सांगितल्याने घटस्फोट - इम्रान खानच्या पत्नीचा खुलासा

By Admin | Updated: November 16, 2015 11:40 IST2015-11-16T11:40:37+5:302015-11-16T11:40:37+5:30

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू व नेते इम्रान खानने मला चपात्या बनवायला सांगितले होते व माझ्या घराबाहेर पडण्यावरही त्यांचा आक्षेप होता असा खुलासा इम्रानची पत्नी रेहम खानने केला आहे.

Divorce by making a chapati - disclosure of Imran Khan's wife | चपात्या बनवायला सांगितल्याने घटस्फोट - इम्रान खानच्या पत्नीचा खुलासा

चपात्या बनवायला सांगितल्याने घटस्फोट - इम्रान खानच्या पत्नीचा खुलासा

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. १६ -  पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू व नेते इम्रान खानचे कुटुंब मला चपात्या बनवायला सांगितले होते व माझ्या घराबाहेर पडण्यावरही त्यांचा आक्षेप होता असा खुलासा इम्रानची पत्नी रेहम खानने केला आहे. यामुळेच आमचा घटस्फोट झाला असा दावाही त्यांनी केला.  

इम्रान खान व ४२ वर्षीय पत्रकार रेहम खान यांनी लग्नाच्या १० महिन्यानंतर ३० ऑक्टोबररोजी घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटाच्या दोन आठवड्यानंतर रेहम खान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घटस्फोटाचे कारण उघड केले. 'निकाहानंतर इम्राम खानच्या कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींना मी किचनमध्ये थांबून चपात्या बनवायला पाहिजे असे वाटायचे. मी घराबाहेरही पडू नये असे त्यांना वाटत होते असे रेहम यांनी सांगितले. 'मी इम्रानसोबत काहीच बोलू शकत नव्हते. मी बॉलीवूडवर बोलू शकत नव्हते, फक्त राजकारणावरच त्याच्याशी बोलू शकायची' अशी खंत रेहम यांनी व्यक्त केली.  ६२ वर्षाच्या इम्रान खान यांनी १० महिन्यांपूर्वी पत्रकार रेहम खानसोबत निकाह केला होता. 

 

Web Title: Divorce by making a chapati - disclosure of Imran Khan's wife