शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे बंद दाराआड नवरा-बायकोचे पटेना, घटस्फोटांच्या अर्जात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 16:32 IST

माध्यमांमधील वृत्तांनुसार कोरोना व्हायरसमुळे जास्तीत जास्त लोक घरात बंद आहेत. यामुळे पती-पत्नीमध्ये वादाचे प्रमाण वाढले आहे. याची परिणती घटस्फोटात होत आहे. चीनमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकोरोना व्हायरस संसर्गाचे जगभरात उमटतायेत पडसाद चीनमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढलेइटलीमध्ये इंटरनेटचा वापर वाढला

बिजिंग/रोम : जगभरात कोरोनाचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. यातच चीनमध्ये या व्हायरसमुळे घटस्फोटांच्या प्रकरणात वाढ झाल्याचेही समोर आले आहे. चीनच्या शिचुआन प्रांतात एका महिन्यात तब्बल 300 हून अधिक कुटुंबीयांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

माध्यमांमधील वृत्तांनुसार कोरोना व्हायरसमुळे जास्तीत जास्त लोक घरात बंद आहेत. यामुळे पती-पत्नीमध्ये वादाचे प्रमाण वाढले आहे. याची परिणती घटस्फोटात होत आहे. चीनमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. डाझोऊ भागातील लग्न नोंदणी कार्यालयाचे व्यवस्थापक लू शिजून यांनी म्हटले आहे की, 'शेकडो कुटुंबीये  आपले लग्न मोडून घटस्फोटाचा विचार करत आहेत. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात लोकांनी घटस्फोटासाठी अर्ज केले आहेत. यातील बहुसंख्य प्रकरणांमध्ये पती-पत्नी बराच काळ घरात एकत्र असल्याने त्यांच्यातील वादाचे आहे. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांनी कोरोना व्हायरसमुळे ऑफिस बंद असल्याने घटस्फोट प्रकरणांची संख्या वाढल्याचे म्हटले आहे. 

इटलीमध्ये इंटरनेटचा वापर वाढलाचीन नंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. येथी नागरिकांवर आपल्या घरातच बंदिस्त होण्याची वेळ आली आहे. यामुळे इटलीतमध्ये इंटरनेटच्या मागणी 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. येथील लोक वेबसीरीज पाहून आणि ऑनलाईन गेम खेळून वेळ घालवत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसchinaचीनItalyइटलीmarriageलग्नDivorceघटस्फोट