काश्मीर मुद्याशिवाय भारताशी चर्चा अशक्य
By Admin | Updated: September 9, 2015 02:53 IST2015-09-09T02:53:57+5:302015-09-09T02:53:57+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानशी चर्चेसाठी अटी लादत आहेत. तथापि, आम्हीही काश्मीरच्या मुद्याशिवाय कुठलीही चर्चा स्वीकारूच शकत नाही, अशा शब्दांत

काश्मीर मुद्याशिवाय भारताशी चर्चा अशक्य
इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानशी चर्चेसाठी अटी लादत आहेत. तथापि, आम्हीही काश्मीरच्या मुद्याशिवाय कुठलीही चर्चा स्वीकारूच शकत नाही, अशा शब्दांत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी आज दोन्ही देशांतील चर्चेच्या पूर्वसंध्येला आपली आडमुठी भूमिका जाहीर केली.
पाकिस्तान रेंजर्स आणि सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांची बुधवारी नवी दिल्लीत बैठक होत आहे. अजीज म्हणाले की, मोदी यांनी पाकिस्तानविरोधी भूमिका घेऊनच निवडणुका लढविल्या आणि आज ते चर्चेसाठी आमच्यावर अटी लादत आहेत; मात्र आम्ही या अटी मान्य करणार नाही, असा संदेश आम्ही नवी दिल्लीतही दिला आहे. नियंत्रण रेषेवर भारताकडून होत असलेल्या गोळीबाराचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला जाईल. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करणे हा या बैठकीचा मूळ उद्देश आहे. २००३ मध्ये झालेल्या संघर्ष विराम कराराचा विषयही चर्चिला जाईल. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र विषयांचे विशेष सहायक तारिक फातमी यांनी चीनच्या सरकारी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, भारत जर त्यांच्या पूर्वअटींवर कायम राहिला तर भारत-पाकिस्तान यांच्यात चर्चा होऊ शकत नाही. भारत व पाकिस्तानात यापूर्वी अशा अटींवर आधारित चर्चा कधी झाली नाही, असेही फातमी म्हणाले.