युजरच्या टिष्ट्वटवरून कळणार त्याचे आरोग्य, अमेरिकी विद्यापीठाचे संशोधन
By Admin | Updated: July 11, 2015 01:38 IST2015-07-11T01:38:58+5:302015-07-11T01:38:58+5:30
टिष्ट्वटरच्या युजरने केलेल्या टिष्ट्वटवरून त्याचे आरोग्य कसे आहे हे आता समजणार आहे. नव्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

युजरच्या टिष्ट्वटवरून कळणार त्याचे आरोग्य, अमेरिकी विद्यापीठाचे संशोधन
न्यूयॉर्क : टिष्ट्वटरच्या युजरने केलेल्या टिष्ट्वटवरून त्याचे आरोग्य कसे आहे हे आता समजणार आहे. नव्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ (एनआयएच) या संस्थेने टिष्ट्वटरवरील वागणूक व हृदयाचे आरोग्य या विषयावर संशोधन करण्यासाठी पेनिसिल्व्हानिया विद्यापीठाला ६ लाख ६८ हजार डॉलर्सचे अनुदान दिले होते, त्यातून हे संशोधन करण्यात आले असून ही प्रक्रिया अजून चालू आहे.
टिष्ट्वटरवरील टिष्ट्वटमध्ये वापरण्यात आलेली भाषा व हृदय आणि रक्तवाहिन्या यांच्या संदर्भातील मृत्यू यांचा जवळचा संबंध असल्याचे या संशोधनाच्या निष्कर्षात म्हटले आहे. टिष्ट्वटरवर टिष्ट्वट करताना वापरण्यात येणारी भाषा, कंटाळा, आळस, झोपाळूपणा, अस्वस्थता याबद्दल, तसेच द्वेष, मत्सर, खोटे बोलणे अशा नकारार्थी भावना व्यक्त करणाऱ्या टिष्ट्वटस्चा युजरच्या आरोग्याशी संबंध जोडण्यात आला आहे. टिष्ट्वटमधून अशा भावना व्यक्त करणाऱ्या लोकांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचेही संशोधनात स्पष्ट झाले आहे. अनेक जण आपण काय जेवलो, नाश्ता काय केला अशी माहितीही टिष्ट्वटरवर देतात. त्यामुळे टिष्ट्वटर ही सहज घेण्याची गोष्ट आहे असे त्यांचे मत असते; पण अनेक लोक मनापासून टिष्ट्वट करतात. त्यांच्या मनातील भावनांवरून त्यांचे आरोग्य ओळखता येते असे हे संशोधन करणाऱ्या संशोधकांपैकी एक असणाऱ्या डेव्हिड एस्च यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)