वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अमेरिका दौ:यात न्यूयॉर्कमध्ये भारतीय-अमेरिकी नागरिकांना मार्गदर्शन करणार असून त्यांच्या भाषणाचे शहरातील प्रतिष्ठित टाइम्स स्क्वेअरमध्ये (चौक) विशाल पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
मोदींचे मॅनहटन, न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये 28 सप्टेंबरला भाषण होणार असून त्याचे टाइम्स स्क्वेअरमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. मोदींच्या भाषणाचे आयोजक यासंदर्भात टाइम्स स्क्वेअर अलायन्ससोबत एका सहमती करारावर स्वाक्षरी करणार आहेत. न्यूयॉर्क शहराचे केंद्र मानण्यात येणा:या टाइम्स स्क्वेअरमध्ये विशाल पडद्यावर दाखविण्यात येणा:या मोदींच्या भाषणांत इंग्रजीतून सब-टायटल्स दाखविण्यात येणार आहेत. ऑडियोसाठी किंवा थेट भाषण ऐकण्यासाठी लोक एकतर टोलफ्री नंबर डायल करू शकतात किंवा मग आपल्या स्मार्टफोनवर अॅप वापरून भाषण ऐकू शकतात, असे आयोजकांनी सांगितले. (वृत्तसंस्था)