शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

विमान क्रॅश झाले की घातपात? पायलटने संपर्क साधला, हवाई दल काय करत होते?, मोठी माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 09:32 IST

कझाकस्तानमध्ये काल एक विमान क्रॅश झाले, या अपघातामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला, तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.

कझाकस्तानमधील अकताऊ विमानतळावर काल एका प्रवासी विमान कोसळले. या विमानामध्ये ६७ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.  अजरबॅजान एअरलाइन्सच्या पॅसेंजर विमान बाकू येथील रशियाच्या चेचन्या येथील ग्रोन्जी विमानतळावर जात होते, त्याचवेळी पक्षाने धडक दिली. पक्ष्याच्या धडकेमुळे विमानाची ऑक्सिजन टाकी फुटल्याचा दावा करण्यात आला होता. या विमानात ६७ जण होते. यापैकी ३७ अझरबैजानचे तर १६ रशियाचे नागरिक होते. हा विमान अपघात कोणता घातपात असू शकतो असा दावाही करण्यात येत आहे. 

रशियाचा बदला घेण्याचा शत्रूचा काही कट होता का? कझाकस्तानमध्ये कोसळलेल्या विमानाचे बाहेरून मोठे नुकसान झाल्यामुळे हे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. तसेच अन्य काही घडामोडींबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

भयंकर! तुटलेल्या सीट, विखुरलेलं सामान, मृतदेहांचा खच, अन्...; अंगावर काटा आणणारा Video

तज्ञांच्या मते, कजाकस्तामध्ये ज्या विमानाचा अपघात झाला. त्या विमानाचे बाहेरुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्यावेळी विमान क्रॅश होणार होते, त्यावेळी पायलटने रशियाच्या वायुसेनेला संपर्क केला होता. त्याचवेळी पायलटने संकट काळात केला जाणारा डिस्ट्रेस कॉल केला होता, त्यावेळी रशियाचे वायुदल एका युक्रेनी ड्रोनच्या हल्ल्यावर काम करत होते. यामुळे आता हा हल्ल्याचा कट होता का? असा संशय घेतला जात आहे. रशियाच्या वायुसेनेला एका दुसऱ्या कामात गुंतवून ठेऊन इकडे विमानावर हल्ला करण्याचा कट होता?, असा संशय घेतला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, याअपघातावर कझाकस्तानचे उपपंतप्रधान म्हणाले की, मला वेळेआधी कोणतेही वक्तव्य द्यायचे नाही. त्याचवेळी विमान आपल्या मार्गावरून भरकटल्याने या विमान अपघातावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अझरबैजान एअरलाइन्सचे फ्लाइट J2-8243 त्याच्या नियोजित मार्गापासून शेकडो मैल दूर कॅस्पियन समुद्राच्या विरुद्ध किनाऱ्यावर कोसळले. रशियाच्या विमान वाहतूक नियामकाने सांगितले की ही आपत्कालीन परिस्थिती होती जी पक्ष्यांच्या धडकेमुळे उद्भवली असावी.

या अपघातावर आता कझाकस्तानच्या अधिकाऱ्यांनीही माहिती दिली. अधिकारी म्हणाले, हे विमान अकताऊ शहराजवळ त्याच्या नियोजित मार्गापासून दूर गेले होते. अझरबैजान एअरलाइन्सच्या माहितीनुसार, विमानात ६७ लोक होते, यात ६२ प्रवासी आणि पाच क्रू सदस्य होते. आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान अझरबैजानची राजधानी बाकू येथून कॅस्पियन समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील दक्षिण रशियातील चेचन्यामधील ग्रोंजी शहराकडे जात होते.

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघातrussiaरशिया