शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 21:25 IST

युद्ध हा आंतरराष्ट्रीय वाद सोडविण्याचा मार्ग कधीही असू शकत नाही, असे चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी म्हटले आहे.

एकीकडे इराण-इस्रायल युद्ध विक्राळ रूप धारण करताना दिसत आहे. तर दुसऱ्याबाजूला, या मुद्द्यावर जग दोन गटात विभागताना दिसत आहे. अमेरिकेचा आधीपासूनच इस्रायलला पाठिंबा आहे. तर आता रशियानेइराणला पाठिंबा दर्शवत, अमेरिकेने युद्धात उडी घेतली तर याचे गंभीर परिणाम होतील, अशी थेट धमकीही दिली आहे. रशियानंतर, चीननेही इराणला पाठिंबा देत, इस्रायलला तत्काळ युद्धविराम करण्यास सांगितले आहे. एवढेच नाही, तर युद्ध हा वाद सोडविण्याचा योग्य मार्ग नाही, असेही  चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी म्हटले आहे.

युद्ध हा आंतरराष्ट्रीय वाद सोडविण्याचा मार्ग कधीही असू शकत नाही, असे चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी म्हटले आहे. यापूर्वी, चीनने पाच दिवसांच्या युद्धासंदर्भात मौन सोडत, बीजिंग यासंदर्भात चिंतित असल्याचेही म्हटले होते. तर दुसऱ्याबाजूला, अमेरिकेने इस्रायलला इराणविरुद्धच्या युद्धात लष्करी मदत दिली तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी रशियाने अमेरिकेला दिली आहे.

पुतिन-जिनपिंग यांच्यात फोनवर एक तास चर्चा - चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे हे विधान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत फोनवरून झालेल्या संभाषणातून आले आहे. या दोन्ही नेत्यांनी मध्य पूर्वेच्या स्थितीवर चर्चा केली. तसेच, संबंधित दोन्ही देशांना, प्रामुख्याने इस्रायलला लवकरात लवकर युद्धविराम करण्याचे आवाहनही केले आहे. जेणेकरून या भागात पुन्हा शांतता आणि स्थिरता येईल. यासंदर्भात क्रेमलिनचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी महिती दिली.

कोणता देश कुणाच्या बाजूला? भारताची भूमिका काय? -कोणता देश कोणत्या बाजूला आहे? भारत कुठे उभा आहे? इराण-इस्रायल युद्धादरम्यान, अनेक देशांनी आपल्या वैचारिक मित्रांना पाठिंबा दर्शविला आहे. अमेरिकेशिवाय, सौदी अरेबिया, जर्मनी, कॅनडा, यूके, युएई आणि जॉर्डन यांनी उघडपणे इस्रायलला पाठिंबा दर्शवला असून इराणच्या अणुकार्यक्रमाला विरोध केला आहे. तर रशिया, चीन, इराक, लेबनॉन, पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त यांनी इराणला पाठिंबा देत आहेत. आता भारताचा विचार करता, भारताने कुणालाही समर्थन दिलेले नाही आणि दोन्ही बाजूंना शांततेचे आवाहन करत आहे आणि संवादाद्वारे वाद सोडवण्याचा सल्ला देत आहे.

टॅग्स :chinaचीनrussiaरशियाAmericaअमेरिकाIsraelइस्रायलIranइराणDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिनXi Jinpingशी जिनपिंग