शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Actor Dev Patel: रीलसोबतच रिअल लाईफ हिरो: चाकू हल्ला रोखण्यासाठी स्वतःचा जीव घातला धोक्यात, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 16:52 IST

'स्लमडॉग मिलेनियर'सारख्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेता देव पटेलने एका चाकू हल्ल्यात उडी घेत जखमी व्यक्तीचा जीव वाचवला. विशेष म्हणजे पोलीस आणि अँब्युलन्स येईपर्यंत तो जखमी व्यक्तीच्या संरक्षणासाठी तिथेच थांबला.

कैनबरा: 'स्लमडॉग मिलेनियर'सारख्या चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेला भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेल रिल लाईफ हिरो होताच, पण आता तो रिअल लाईफ हिरोही झाला आहे. देव पटेलने स्वतःचा जीव धोक्यात घालून एका अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवला. एका जोडप्यामध्ये सुरू झालेल्या वादाचे रुपांतर चाकू हल्ल्यात झाले, या वादात देवने उडी घेतली आणि जखमी व्यक्तीचा जीव वाचवला. 

पोलिस येईपर्यंत देव तिथेच थांबलादेव हा ऑस्ट्रेलियातील अॅडलेडचा रहिवासी असून, ही घटनाही तिथे घडली आहे. मंगळवारी देव त्याच्या मित्रांसह अॅडलेडमधील एका जनरल स्टोअरमध्ये गेला होता. दुकानाजवळ एक जोडपे भांडत होते, भांडत असताना महिलेने त्या व्यक्तीच्या छातीवर चाकूने वार केले. यानंतर देव आणि त्याचे मित्र त्या भांडणात पडले आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवला. विशेष म्हणजे, पोलीस आणि रुग्णवाहिका येईपर्यंत जखमी व्यक्तीला सुरक्षित ठेवण्यासाठी देव तिथेच उभा होता.

चाहत्यांनी देवचे कौतुक केलेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील जखमी व्यक्तीची प्रकृती सध्या ठीक आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या आरोपी महिलेला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर चाहते देव पटेलचे कौतुक करत आहेत. धोकादायक परिस्थितीत एखाद्याचा जीव वाचवणे मोठी कौतुकास्पद बाब आहे, असे चाहत्यांनी म्हटले.

18व्या वर्षी स्लमडॉग मिलियनेअर मिळाला2008 मध्ये डॅनी बॉयलच्या स्लमडॉग मिलियनेअरया चित्रपटाने देव पटेल जगप्रसिद्ध झाला. या चित्रपटाने 8 ऑस्कर पुरस्कार जिंकले होते. देव याच्याशिवाय या चित्रपटात फ्रीडा पिंटो, अनिल कपूर हेदेखील होते. देवला 2016 च्या लायन चित्रपटासाठी ऑस्करमध्ये नामांकन मिळाले होते. या चित्रपटात त्याने एका भारतीय मुलाची भूमिका साकारली होती. याशिवाय द लास्ट एअरबेंडर, द मॅन व्हू न्यूव इन्फीनिटी आणि हॉटेल मुंबईसह अनेक चित्रपटात त्याने काम केले आहे.

टॅग्स :Dev Patelदेव पटेलHollywoodहॉलिवूडAustraliaआॅस्ट्रेलिया