शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

"गेल्या ४० वर्षांपासून याच संधीची वाट पाहत होतो"; इराणवर पूर्ण ताकदीने हल्ला करण्याचे नेतन्याहूंचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 23:44 IST

Benjamin Netanyahu: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता इराण -इस्रायल संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलचे ...

Benjamin Netanyahu: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता इराण-इस्रायल संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यावरुन महत्त्वाचे विधान केले आहे. खामेनींचा अंत ही केवळ सुरुवात आहे, आता आम्ही तेहरानच्या हृदयावर घाला घालणार, अशा शब्दांत नेतन्याहू यांनी आपला फ्युचर प्लॅन जाहीर केला आहे. रविवारी सायंकाळी त्यांनी इराणमधील कट्टरपंथी राजवट मुळासकट उपटून टाकण्याचा निर्धार व्यक्त केला.

"आम्ही इराणच्या अत्याचाऱ्यांना सोडणार नाही"

देशाला संबोधित करताना नेतन्याहू म्हणाले, "काल आम्ही हुकूमशहा खामेनी आणि त्यांच्यासोबत डझनभर जालीम नेत्यांचा खात्मा केला. मी नुकतीच संरक्षण मंत्री, मोसादचे प्रमुख आणि लष्करी प्रमुखांसोबत बैठक घेतली आहे. मी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ही मोहीम थांबणार नाही, तर ती आणखी तीव्र होईल. इराणच्या कट्टरपंथी राजवटीला त्यांच्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावा लागेल."

४० वर्षांचे स्वप्न होणार पूर्ण!

नेतन्याहू यांनी आपल्या मनातील एक जुनी इच्छा बोलून दाखवली. ते म्हणाले, "गेल्या ४० वर्षांपासून मला जे करायचे होते, ते करण्याची संधी आता मिळाली आहे. इराणमधील या दहशतवादी राजवटीवर थेट प्रहार करण्याचे माझे स्वप्न होते आणि मी तसे वचनही दिले होते. आता ते वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे."

अमेरिका आणि इस्रायलची युती

या मोहिमेत इस्रायलला अमेरिकेची खंबीर साथ मिळत असल्याचे नेतन्याहू यांनी सांगितले. "आम्ही आयडीएफची संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या युद्धात माझे मित्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन लष्कर आमच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. ही शक्ती आम्हाला इराणचे अस्तित्व संपवण्यासाठी आणि आमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मदत करेल," असेही त्यांनी स्पष्ट केले.

इस्रायली नागरिकांच्या मृत्यूवर व्यक्त केला शोक

युद्ध सुरू असतानाच इराणच्या प्रत्युत्तरार्थ झालेल्या हल्ल्यात तेल अवीव आणि बेत शेमेश येथे काही इस्रायली नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. "हे दिवस वेदनादायी आहेत. आम्ही आमची माणसे गमावली आहेत, माझ्या सहवेदना त्या कुटुंबांसोबत आहे. जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी प्रार्थना करतो," असे नेतन्याहू म्हणाले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Netanyahu Orders Full-Force Attack on Iran: '40-Year Wait Over'

Web Summary : Netanyahu declared a full-force attack on Iran following Khamenei's death, aiming to dismantle the regime. He claims US support and mourns Israeli losses in retaliatory attacks, vowing to fulfill a 40-year-old dream of striking Iran.
टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIranइराणAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेई