शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचे पोट भरण्यासाठी वडील विकतात स्वत:ची किडनी; अफगाणिस्तानात दुर्दैवाचे दशावतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 08:54 IST

हेरात प्रांतातल्या इंजिल जिल्ह्यातील सायशानबा बाजारामध्ये काही दिवसांपूर्वी एका घरासमोर काही माणसांनी रांग लावली होती. ही सर्व बेरोजगार माणसे होती. ती तिथे रोजगाराच्या शोधासाठी नव्हे तर स्वत:ची एक किडनी विकण्यासाठी आली होती.

काबुल : अफगाणिस्तानचातालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील स्थिती आणखी बिकट झाली आहे. त्या देशात बेकारीचे प्रमाण खूप वाढले असून, अन्नधान्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे. उपासमार, गरिबी यांच्याशी झुंजणारे अफगाणी नागरिक आपल्या कच्च्याबच्च्यांची पोटे भरण्यासाठी स्वत:ची एक किडनी विकत आहेत.त्या देशातील हेरात प्रांतातल्या इंजिल जिल्ह्यातील सायशानबा बाजारामध्ये काही दिवसांपूर्वी एका घरासमोर काही माणसांनी रांग लावली होती. ही सर्व बेरोजगार माणसे होती. ती तिथे रोजगाराच्या शोधासाठी नव्हे तर स्वत:ची एक किडनी विकण्यासाठी आली होती. तिथे त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर दोन-चार दिवसांनी त्यातील काही माणसांची निवड होऊन त्यांची एक किडनी शस्त्रक्रियेद्वारे काढून घेण्यात आली. त्याचा त्यांना मोबदलाही देण्यात आला. त्या पैशातून त्या अफगाणी नागरिकांनी आपली मुले, कुटुंबाकरिता अन्नधान्य खरेदी केले. एक किडनी विकून आलेला पैसा फार काळ पुरणार नाही याची कल्पना असूनही जगण्याच्या संघर्षात अजून काही काळ तगून राहाण्यासाठी अफगाणिस्तानचे नागरिक हे टोकाचे पाऊल उचलत आहेत. हेरात प्रांतामध्ये किडनी विकण्याचे प्रमाण वाढले व आता हे लोण साऱ्या अफगाणिस्तानमध्ये पसरत आहे. (वृत्तसंस्था)३.८ कोटी लोक उपासमारीच्या समस्येने ग्रस्तअफगाणिस्तानवर तालिबानने सहा महिन्यांपूर्वी कब्जा केला. गेल्या वीस वर्षांपासून तो देश युद्धाच्या झळा सोसत होता. त्यामुळे आधीच हालाखीच्या स्थितीत सध्या आणखी भर पडली आहे. त्या देशातील ३.८ कोटी लोक उपासमारीच्या समस्येने ग्रस्त आहे. गरिबीचे प्रमाणही खूप वाढलेले आहे.किडनीचे रॅकेट आंतरराष्ट्रीय?अफगाणिस्तानातील किडनी रॅकेट चालविणारे लोक गोरगरिबांना मोबदल्याचे आमिष दाखवून त्यांची एक किडनी शस्त्रक्रियेद्वारे काढून घेतात. ज्यांना किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे, अशांना ही किडनी मोबदल्यापेक्षा तिप्पट-चौपट किमतीने विकली जाते. या रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्या सामील असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान