शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:32 IST

...याचा अर्थ, गाझाच्या विनाशात आणि विध्वंसात अमेरिकेचा हात आहे आणि पॅलेस्टाईनमधील हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या भागीदारांमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांकावर आहे. गाझाला मानवमुक्त करून तेथे ज्यू लोकांना वसवण्याची अमेरिकेची इच्छा आहे.

गाझा युद्धामुळे झालेल्या विध्वंसाच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रांमध्ये सादर करण्या आलेल्या ठरावाला अमेरिकेने व्हेटो केल्याने जमियत उलेमा-ए-हिंदने नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात जमियत उलेमा-ए-हिंदने शुक्रवारी (६ जून २०२५) एक निवेदन जारी करून गाझामध्ये होत असलेल्या विनाशासाठी आणि विध्वंसासाठी अमेरिकेला जबाबदार ठरवले आहे. यासंदर्भात बोलताना, जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी म्हणाले, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावावर व्हेटो केल्याने, अमेरिका मानवतेचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अमेरिकेमुळे मंजुर होऊ शकला नाही UNSC चा प्रस्ताव -जमीयत उलमा ए हिंदने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायल आणि हमास यांच्यात तत्काळ, व्यापक आणि कायमस्वरूपीची  युद्धबंदी, गाझामध्ये मानवतावादी मदत त्वरित उपलब्ध होणे आणि मूलभूत हक्क बहाल करण्यासंदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) 15 पैकी 14 सदस्यांकडून एक महत्वपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, 15 पैकी 14 सदस्यांनी समर्थनार्थ मतदान केले मात्र, अमेरिकेने व्हीटो पॉवर वापरल्याने सुरक्षा परिषदेत हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही.

इस्रायलकडून गाझामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांवर होत असलेली बॉम्बिंग आणि अत्याचारांविरुद्ध कायमस्वरूपी युद्धबंदीच्या प्रस्तावावर अमेरिकेने दिलेल्या व्हेटोवर जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, "१४ देशांनी हा प्रस्ताव मांडला होता, परंतु अमेरिकेने त्याला पाठिंबा दिला नाही. याचा अर्थ, गाझाच्या विनाशात आणि विध्वंसात अमेरिकेचा हात आहे आणि पॅलेस्टाईनमधील हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या भागीदारांमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांकावर आहे. गाझाला मानवमुक्त करून तेथे ज्यू लोकांना वसवण्याची अमेरिकेची इच्छा आहे. मात्र, अल्लाहची इच्छा असेल तर हे कधीही शक्य होणार नाही."

हमासचे कौतुक करत मौलाना मदनी म्हणाले, "अमेरिका, इस्रायल आणि हमासचा संपूर्ण खात्मा करण्याची इच्छा बाळगून असणारे देश, अद्यापही अपयशी ठरले आहेत. ही परिस्थिती कायम ठेवण्यासाठी गाझातील सुमारे एक लाख शहीदांनी निःसंशयपणे आपले रक्त सांडले आहे. जमियत उलेमा-ए-हिंद पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यसैनिकांप्रति मनापासून सहवेदना व्यक्त करते आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पूर्ण पाठिंबा देते." 

टॅग्स :Israelइस्रायलPalestineपॅलेस्टाइनIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धAmericaअमेरिकाUnited Statesअमेरिका